फायद्याची गोष्ट ! दरमहा फक्त 5000 ‘गुंतवा’ अन् 25 वर्षात ‘मिळवा’ 1 कोटी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक नियोजनासाठी सर्वात महत्वाचे असते ते निवृत्तीनंतरच्या गरजा. एक चांगली रक्कम जमा करुन ठेवणे ज्याचा पुढील जीवनात अडीनडीला वापर करता येईल. पहिल्यांदा व्यक्ती नोकरी व्यवसाय करुन पैसा जमा करतो आणि निवृत्तीनंतर कमावलेल्या पैशातून आपल्या गरजा पूर्ण करतो. त्यासाठी एनपीएसची ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.

काय आहे NPS –
1. सध्या नॅशनल पेमेंट सिस्टम लोकप्रिय योजना आहे. या योजनेचे 1.25 कोटी सब्सक्राइबर्स आहेत, ज्यात 44 लाख खासगी क्षेत्रातील आहेत. ही एक सरकारी रिटायरमेंट बचत योजना आहे.

2. ही योजना म्यूचुअल फंडसारखाच मॅनेज होते. यामुळे यातून चांगला परतावा मिळतो.

3. ही योजना सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. 1 जानेवारी 2004 नंतर नोकरी करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी ही योजना अनिवार्य आहे.

4. योजनेत ग्राहकांना आपल्या नोकरी दरम्यान दर महिन्याला काही रक्कम एनपीएसमध्ये जमा करावी लागते.

5. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आपल्या फंडमधून एक हिस्सा काढता येतो आणि बाकी रक्कम नियमित उत्पन्नासाठी सुरक्षित ठेवता येते.

6. एनपीएसमध्ये 18 ते 60 वर्ष वयापर्यंतचे लोक सहभागी असतात.

7. देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खासगी बँकेत जाऊन एनपीएस अकाऊंट सुरु करता येते.

कसे काम करते एनपीएस –
तज्ज्ञांच्या मते यात 3 प्रकारे गुंतवले जातात. पहिला इक्विटी, दुसरे कॉर्पोरेट बॉन्ड, तिसरे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ग्राहकांना यात गुंतवणूक करण्यापूर्वी असेट अलोकेशन आणि ऑटो च्वाइनस दोन्ही पर्याय उपलब्ध असतात. ऑटो च्वाइसमध्ये सुरुवातीला इक्विटीमध्ये 50 टक्के हिस्सा असतो आणि वेळेनुसार हे कमी होत जाते. तर असेट अलोकेशनमध्ये ग्राहकांना 75 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते.

कसे करतात असेट अलोकेशन –
जर ग्राहकांना असेट अलोकेशन लक्षात आले नाही तर ते पुन्हा पुन्हा हे करण्यापासून दूर राहतात. ते ऑटो च्वाइसचा पर्याय निवडतात. जर ग्राहक असेट अलोकेशनचा पर्याय निवडतात. तर तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांना अधिकतम हिस्सा इक्विटीमध्ये ठेवावा लागतो. जेव्हा रिटार्यमेंट जवळ येते तेव्हा इक्विटीमध्ये हिस्सा थोडा कमी पाहिजे. यामुळे ग्राहक बऱ्याच काळापासून एनपीएसमधून चांगला परतावा मिळू शकतो. एनपीएसमध्ये दर वर्षीपूर्वी असेट अलोकेशनची आवश्यकता लागत नाही.

एनपीएसमध्ये रिटर्न असेट अलोकेशन, मासिक योगदान आणि मॅच्युरिटीचा कालावधीवर निर्भर असतो. एनपीएसमध्ये सरकारी परतावा 9 ते 10 टक्के मिळतो, तज्ज्ञांच्या मते महिन्याला 5,000 रुपये जमा केले तर 25 वर्षानंतर परतवा 1 कोटी रुपयंपर्यंत असतो.

या वयात सुरु करा खाते –
एनपीएस खाते जितक्या कमी वयात सुरु करु तितक्या जास्त परतावा मिळेल. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष असेल तर त्याला 30 ते 35 वर्षाच्या वयात एनपीएस खाते सुरु करावे लागेल.

प्री मॅच्युअर विड्रोल नको –
एनपीएसमध्ये प्री मॅच्युअर विड्रॉल करण्यास परवानगी नसते पंरतु काही विशेष परिस्थिती ही सूट दिली जाते. आजार, घर खरेदी, व्यवसाय सुरु करणे, मुला – मुलींचे शिक्षण, विवाह या कार्यांसाठी प्री मॅच्युअर विड्रॉल करता येईल. एनपीएस खाते सुरु झाल्यानंतर जितका फंड जमा होईल, त्यात कंपनीच्या फंड शिवाय रक्कमेच्या 25 टक्के रक्कम काढता येईल. प्री मॅच्युअर पाच पाच वर्षांच्या टप्प्याने फक्त 3 वेळा काढता येतो. परंतु तज्ज्ञ एनपीएसमधील पैसे न काढण्याचा सल्ला देतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like