फायद्याची गोष्ट ! मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये ‘गुंतवणूक’ करा अन् मिळवा दरमहा 10 हजार रूपये ‘पेन्शन’, शेवटचे काही दिवस शिल्लक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आजच्या महागाईच्या काळात बचत करणे खूप मुश्किल असते. त्यात निवृत्तीनंतर पैशांची मोठी चणचण भासते. त्यासाठी बाजारात अशा काही योजना आहेत, ज्या निवृत्तीनंतरच्या काळत आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरतात. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान वया वंदना (PMVVY) योजना. या सरकारी योजनेत आपल्याला ८ ते ८.३० टक्के व्याज मिळतं. परंतु हे व्याजसुद्धा मासिक, तिमाही आणि सहामाही किंवा वार्षिक पर्यायांवर अवलंबून असतं. जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असले तर ३१ मार्च २०२० पर्यंत पाऊल उचलणे अत्यंत महत्वाचे आहे.

योजनेचे फायदे :
या योजनेची मर्यादा १० वर्षांसाठी असून आपण इच्छित असल्यास पुढेही गुंतवणूक करू शकता. जर पेन्शन धारक या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 वर्षांपर्यंत जिवंत राहिल्यास त्या संबंधित व्यक्तीला एरियरही दिला जाणार आहे. तसेच या योजनेतील कालावधी पूर्ण होण्या आधीच पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास गुंतवणुकदाराच्या कुटुंबीयांस उर्वरित रक्कम परत केली जाणार जाईल. पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थी व्यक्ती जिवंत राहिल्यास त्याला पॉलिसीच्या खरेदी रकमेसह अंतिम पेन्शन हप्त्याहप्त्यानं दिली जाते.

सरकारच्या या योजनेचा लाभ ६० वर्षं आणि त्याहून अधिक वयाचे जेष्ठ नागरिक घेऊ शकतात. या योजनेंतर्गत मासिक पेन्शन म्हणून त्यात जास्तीत जास्त वयाची मर्यादा नाही. महिन्याला कमीत कमी १ हजार आणि जास्तीत जास्त मासिक पेन्शन १०००० रुपये मिळते. तसेच तुम्ही किती कालावधीसाठी पेन्शन मिळवणार आहात ते पेन्शनच्या रकमेवर अवलंबून असतं. या योजनेत जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवणूक करता येते. जर ग्राहकाला प्रतिमहिना १ हजार रुपये पेन्शन हवी असेल तर १,५०,००० रुपये जमा करावे लागतील. तसेच जर १०,००० रुपये प्रतिमहिना पेन्शन हवी असल्यास १५,००,००० रुपये जमा करावे लागणार आहेत.

LICच्या माध्यमातून या योजनेचा लाभ :
आर्थिक वर्ष 2018-19 च्या बजेट दरम्यान केंद्र सरकारनं वरिष्ठ नागरिकांच्या योजनेची अंतिम तारीख वाढवून 31 मार्च 2020 केली होती. त्याची जास्तीत जास्त मर्यादा वाढवून 15 लाख रुपये केली आहे. आपण ही योजना भारतीय जीवन विमा निगम (LIC)च्या माध्यमातूनही घेऊ शकतो. तसेच ही सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनंही मिळवता येते. दरम्यान पंतप्रधान वय वंदना योजनेच्या अर्जसाठी ग्राहकांना (भारतीय जीवन बीमा निगम) LICची वेबसाइट लिंक https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/pmvvymain.do भेट देत. तेथे उपलब्ध योजनेचा फॉर्म भरून महत्वाचे दस्तावेज लागोपाठ LICच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन जमा करता येतील. या योजनेसाठी ऑनलाइन सुविधाही देण्यात आली आहे.

PMVVY योजनेत गुंतवणुकीसाठी वास्तव्याचा पुरावा, पॅन कार्डची कॉपी, बँकेच्या चेकची कॉपी किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी हे दस्तऐवज असणे महत्वाचे आहे. तसेच या योजनेत ग्राहकाला गुंतवणूक करून तीन वर्ष झाल्यास कर्ज घेण्याचीही सुविधा मिळते. दिलेलं कर्ज फेडण्याचीही एक विशिष्ट मुदत देण्यात येते.