पोस्टाच्या गुंतवणूकीवरील ‘या’ स्कीममध्ये मिळतोय जादा परतावा अन् दरमहाचं उत्पन्न, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुंतवणूकीत जर मंथली इनकम मिळणार असेल तर फायदेशीरच ठरतं. तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणूक करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना अत्यंत फायदेशीर ठरेल. ही योजना आहे मंथली ऑफिस स्कीमची. ही एक स्मॉल सेविंग स्कीम आहे. ज्यातून एका मोठ्या रक्कमेच्या गुंतवणूकीवर फिक्स्ड मंथली इनकम मिळते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर मानली जाते.
हे लोक घेऊ शकतात योजनेचा फायदा –
कोणताही भारतीय नागरिक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही गुंतवणूक करु शकतो. पीओएमआयएस खात्याला सहज एका पोस्ट ऑफिस शाखेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस शाखेत ट्रांसफर करु शकतात. पीओएमआयएस खाते सुरु करण्यासाठी किमान वर्ष 10 वर्ष असणे आवश्यक आहे. एनआरआय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
ही आहे गुंतवणूकीची मर्यादा –
या योजनेत अकाऊंट सुरु करण्यासाठी खात्यात किमान रक्कम 1,500 रुपये ठेवावे लागते. तर या योजनेत जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत खाते सुरु करताना आणि त्यानंतर नॉमिनेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे.
सुरु करु शकतात जाॅइंट अकाऊंट –
या योजनेत दोन किंवा तीन जाॅइंट खाते सुरु करु शकतात. जाॅइंट खाते असल्यास खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत रक्कम ठेवला येते. सिंगल अकाऊंटनंतर जाॅइंट अकाऊंटमध्ये बदलू शकतात.
मॅच्युरिटी –
या योजनेचा मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्षापर्यंत आहे.
करात मिळत नाही सुट –
पोस्ट ऑफिसच्या या मंथली इनकम योजनेत आयकरमध्ये सूट देण्यात येत नाही. योजनेतील व्याज टॅक्सेबल आहे.
इतके मिळते व्याज –
पोस्ट ऑफिसच्या या मंथली इनकम योजनेचे व्याज केंद्र सरकारकडून ठरवले जाते. अर्थमंत्रालय दर तीन महिन्यांनंतर या योजनेचे व्याजदर ठरवते. आता ऑक्टोबरपासून डिसेंबर या तिमाहीत पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजनेवर व्याज दर 7.6 टक्के निश्चित करण्यात आले आहेत. योजनेत व्याज दरांची मोजणी वर्षाच्या आधारे करण्यात येते आणि गुंतवणूकदारांना मासिक इनकम मिळते.
Visit : Policenama.com
- ‘फ्लॅट टमी’ दिवसभरात द्या फक्त १५ मिनिटे, ‘हे’ 6 व्यायाम करा
- गरोदर आहात ? सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय ? मग ‘हे’ 5 उपाय करा
- चुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांमध्ये वाढ ! नपुंसकतेमुळे अनेकजण त्रस्त
- वजन कमी करण्यासाठी काय करणार ? व्यायाम की आहारावर नियंत्रण, जाणून घ्या
- वजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय, जाणून घ्या
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या