खुशखबर ! सरकारच्या ‘या’ स्कीमव्दारे घ्या स्वस्तात सोनं, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी यावेळी सॉवरेन गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. यावर्षी सरकारने सॉवरेन बॉन्ड स्कीमचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. या स्कीमची सुरुवात ८ जुलैपासून होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी विक्री १२ जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर १६ जुलैला बॉन्ड लागू करण्यात येतील.

या टप्प्यात एक ग्राम सोन्यांची किंमत ३४४३ रुपये ठेवण्यात आली आहे. गुंतवणूक करताना अर्ज भरल्यानंतर डिजिटल मोडमध्ये पेमेंट केल्यास त्यावर ५० रुपये प्रति ग्रॉम असे अतिरिक्त डिस्काऊंट देण्यात येईल. यामुळे ऑनलाइन गुंतवणूक केल्यास ग्राहकाला एक ग्राम सोन्याची किंमत ३९९३ रुपये असेल.

काय आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड
सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूकदारांना सोन्यावर पैसा गुंतवणूक करण्याची संधी मिळते. यासाठी तुम्हाला खरोखरच सोने ठेवण्याची गरज नाही, योजनेत गुंतवणूकदाराला प्रति युनिट सोन्यावर गुंतवणूक करण्याची संधी मिळते. ज्यात गुंतवणूकदाराला एक बॉन्ड विकण्यात येतो, ज्याची किंमत बाजार मूल्याशी असलेल्या सोन्याशी जोडलेले राहिलं. म्हणून या बॉन्डला गोल्ड बॉन्ड म्हणण्यात आले आहे.

येथून घेता येईल या योजनेचा लाभ
सॉवरेन गोल्ड बॉन्डची विक्री स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि शेड्यूल्ड कमर्शियल बँकांमध्ये तसेच काही पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात येते. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये या बॉन्डची खरेदी करता येते.

४ टप्प्यात विक्री
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम च्या दुसऱ्या टप्प्यात विक्री झाल्यावर लगेचच ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील विक्री करण्यात येणार आहे. तर चौथ्या टप्प्यात बॉन्डची विक्री ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. आणि हे बॉन्ड १७ सप्टेंबर पासून लागू होतील.

आरोग्यनामा विषयक

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर