PPF अकाऊंट बाबतच्या ‘या’ 10 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत काय, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – पब्लिक प्राॅव्हिडंट फंड म्हणजेच PPF संबंधित सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत व्याजदर 7.9 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात व्याज दरात कोणतेही बदल झाले नाहीत. पीपीएफ जास्त कालावधीसाठी चांगली गुंतवणूक मानण्यात येते. ही एक सुरक्षित गुंतवणूक देखील मानली जाते. याशिवाय पीपीएफमध्ये टॅक्समधून सूट देखील मिळते. पीपीएफमध्ये 1.5 लाख गुंतवल्यास आयकर अधिनियमच्या कलम 80 सी अंतर्गत सूटीचा लाभ देखील मिळतो. एवढेच नाही, पीपीएफमध्ये व्याज उत्पन्न आणि मॅच्युरिटी देखील टॅक्स फ्री असेल. याच पीपीएफ संबंधित काही बाबी आहेत ज्या तुम्हाला माहित हव्यात.
1) कोणताही पालक आपल्या अल्पवयीन पाल्याच्या नावे पीपीएफ खाते सुरु करु शकतात.
2) जर पीपीएप खात्यातील योगदान खातेधारकांच्या उत्पन्नातून येत असेल तर आयकर अधिनियम कलम 80 सी अंतर्गत आयकरातून सूट देण्यात येईल.
3) जेव्हा अल्पवयीन पाल्य 18 वर्यांचा होईल. त्यानंतर पाल्याला पुन्हा एकदा अर्ज करावा लागेल. वयात आलेल्या मुलांचे हस्ताक्षराला खाते सुरु करणाऱ्या पालकांना अटेस्टेड करुन परवानगी द्यावी लागेल. यानंतर खाते त्या मुलाकडे किंवा मुलीकडे सुपूर्त करण्यात येईल.
4) पीपीएफ खात्यामध्ये सातव्या वित्तीय वर्षापासून आंशिक रक्कम काढता येईल. पीपीएफ अकाऊंटवर आंशिक रक्कम काढणे टॅक्स फ्री असेल.
5) जेव्हा पीपीएफ खाते 15 वर्षापर्यंत पुढे वाढवण्यात येईल तेव्हा देखील आंशिक म्हणजेच काही प्रमाणात रक्कम काढता येईल.
6) पीपीएफ अकाऊंटच्या मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षाच्या योगदानानंतर पुढे वाढवता येतो. पीपीएफ अकाऊंट बंद होईपर्यंत व्याज देण्यात येते.
7) जर तुम्ही 15 वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर पीपीएफ खाते सुरु ठेवायचे असेल तर मॅच्युरिटीच्या तारखेनंतर एक वर्षांच्या आता H फॉर्म भरुन जमा करावा लागेल.
8) पीपीएफचे जाॅइंट खाते सुरु करता येत नाही.
9) एनआरआय नवे पीपीेएफ खाते सुरु करु शकत नाहीत. परंतू एनआरआय आपल्या पहिल्या सध्याच्या खात्याला सुरु ठेवू शकतात. तसेच ते आता त्यांच्या सध्याच्या खात्यात योगदान देखील देऊ शकणार नाहीत.
10) पीपीएफ खात्याच्या व्याजाची गणना प्रत्येक महिन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या तारखेदरम्यान किमान रक्कमेवर होईल. यामुळे जास्त व्याज मिळवण्यासाठी खातेदाराला आपले योगदान किंवा एकत्र रक्कम दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी जमा करणे आवश्यक आहे.
Visit : Policenama.com
- बाजारत आली आहेत ‘प्लास्टिकची अंडी’, आरोग्यासाठी घातक, अशा प्रकारे ओळखा
- दररोज साफ करा तुमची जीभ, अन्यथा होऊ शकतो ‘हा’ आजार, जाणून घ्या
- नस अचानक चढल्यावर करा ‘हा’ घरगुती उपाय, मिळेल त्रासापासून सुटका
- पोट भरले म्हणून ढेकर येतो, हा गैरसमज ; खरे कारण जाणून घ्या
- ‘मिसकॅरेज’ची भीती वाटते का ? ‘हे’ प्रभावी उपाय करा… आणि निश्चिंत व्हा
- सावधान ! शारीरीक संबंध न ठेवताही होऊ शकतो लैंगिक आजार, जाणून घ्या
- जेवण केल्यानंतर पोटात गॅस होतो का ? मग तुमच्या आहारात करा ‘हे’ ५ बदल