Homeताज्या बातम्याInvestment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र, 'हे' अवलंबल्याने बनू शकता...

Investment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र, ‘हे’ अवलंबल्याने बनू शकता श्रीमंत; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Investment Tips | तज्ज्ञ म्हणतात की, श्रीमंत बनण्याचा सर्वात पहिला मंत्र आहे बचत (Saving) आणि आणखी जास्त बचत. योग्य वेळी बचत सुरू करणे आणि संपत्ती जमवणे (Investment Tips) यामध्ये थेट संबंध आहे. येथे आपण श्रीमंत बनण्याच्या काही मंत्रांवर चर्चा करणार आहोत. जर तुम्ही वेळेवर आणि कडक शिस्तीने या मंत्रांचे पालन केले तर निश्चितच करोडपती (how to become crorepati) बनू शकता.

 

1. बचत आणि केवळ बचत (Money Saving Tips)

बचतीला लवकर सुरूवात करा. नोकरीला लागताच 25-30 वर्षाच्या वयात दर महिना किमान 15,000 रुपयांची बचत करा. 30 वर्षानंतर म्हणजे तुम्ही 60 वर्षाच्या निवृत्तीच्या वयात पाऊल टाकाल तेव्हा तुमच्याकडे 5 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमलेली असेल.

 

बचत वाढवणे

जर गुंतवणुकीस 10 वर्षे उशीर केलात तर ती 15,000 वरून वाढवून 25,000 रुपये महिना करावी लागेल. बचतीमध्ये खंड पडू देऊ नका. या बचतीत दरवर्षी वाढ सुद्धा करावी लागेल. दरवर्षी रक्कमेत 10 टक्के वाढवावेत. पाच टक्के सुद्धा वाढवू शकता.

2. गुंतवणुकीत समजदारी (Investment Tips)

योग्य ठिकाणी बचत केली नाही तर तुमच्या कष्टाची कमाई पाण्यात जाऊ शकते. पोर्टफोलियो सामान्य ठेवा. जास्त प्रॉडक्ट सहभागी करून गुंतागुंत करू नका. शिस्त आवश्यक आहे. मोठ्या कालावधीसाठी एसआयपी सुरू करा. नियमित अंतराने पोर्टफोलियोचे पुनरावलोकन करा. यासाठी वेळोवेळी मार्केट एक्सपर्टची मदत घ्या.

 

3. खर्चावर नियंत्रण (Control of expenditure)

बचतीसह खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. देखाव्यापेक्षा सोप, सहज जीवनशैली अवलंबा. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर टाळा. घर खर्चासाठी नेहमी रोकड वापरा. बोनस किंवा अतिरिक्त कामाचे पैसे मिळाल्यास घरात खर्च न करता गुंतवणुक करा.

 

गुंतवणुकीचा इतर गरजांसाठी वापर करणे टाळा

जे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक सुरू केली आहे त्याच कामासाठी गुंतवणूक वापरा. एक गुंतवणूक इतर लक्ष्यासाठी कधीही वापरू नका. यामुळे तुम्हाला फंड वेळेच्या अगोदर करण्याची गरज भासू शकते आणि गुंतवणूक योग्यप्रकारे वाढू शकणार नाही.

 

गुंतवणुकीचा क्रम तुटू नये यासाठी गुंतवणूक लॉक-इन ऑपशनमध्ये लावावी लागेल. जेणेकरून कितीही गरज पडली तरी तुम्ही वेळेच्या अगोदर त्या गुंतवणुकीतून पैसा काढ शकणार नाही.

 

4. इमर्जन्सी फंड तयार ठेवा (Emergency fund)

हेच खरे आहे की, एखाद्या इमर्जन्सीच्या काळात आपली बचतच आपल्या उपयोगी येते.
परंतु कोणत्याही इमर्जन्सीमध्ये योग्य टार्गेटसाठी सुरू केलेल्या गुंतवणुकीचा वापर करू नका.

 

अशाप्रकारच्या गरजांसाठी तुम्हाला एक वेगळा इमर्जन्सी फंड बनवून वाटचाल करावी लागेल.
इमर्जन्सी फंड तुम्हाला अचानक मदत करेल.
आपल्या नियमित मासिक खर्चाच्या हिशेबाने तुमच्याकडे कमीत कमी 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड असावा.

 

Web Title :- Investment Tips | crorepati kaise bane how to become crorepati money making tips how to become millionaire

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Electricity Mobility Promotion Policy | गाडी खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! ‘हे’ सरकार देतंय 3 लाखापर्यंत सबसिडी, जाणून घ्या

Income Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा 1 जानेवारीनंतर द्यावी लागेल ‘पेनल्टी’

Pune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत; व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News