2020 मध्ये ‘मालामाल’ होण्यासाठी ‘या’ गोष्टींवर लक्ष ठेवा ! सर्व ‘अपेक्षा’ होतील पुर्ण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षाच्या सुरूवातीच्या बरोबरच आपण आर्थिकदृष्ट्या किती मजबूत आहोत हे पाहणे ही महत्वाचे असते. यासाठी सर्वात महत्वाचे आहे की आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपण आपलं सध्याचं आयुष्य आणि भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केले पाहिजे. तथापि, गुंतवणूकीसाठी आपण दोन गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. सर्वात पहिले आपल्याला आपल्या आर्थिक उद्दीष्टाचे योग्य मूल्यांकन करावे लागेल आणि दुसरे म्हणजे आपल्या गुंतवणूकीबद्दल आपण किती जोखीम घेऊ शकतो हे समजून घेणे.

नियोजन करणे अत्यंत महत्वाचे

जोखीम संदर्भात आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. असे नसते की आपल्याला वाटते तेव्हा आपण काही पैसे वाचविले. आपल्याला त्यात सतत गुंतवणूक करावी लागते. अशा परिस्थितीत जीवनात इतर गोष्टींचे जसे नियोजत केले जाते त्याच पद्धतीने गुंतवणूकीसाठी आर्थिक नियोजन करणे अधिक चांगले असते.

योग्य मालमत्ता वाटप

याबरोबरच आपल्याला आपली मालमत्ता वाटप (Asset Allocation) कशी करावी हे देखील माहित असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला इक्विटी फंड, कर्ज फंड आणि इतर फंडांमध्ये किती पैसे ठेवायचे आहेत हे देखील आपल्याला माहित असणे आवश्यक असते. यामुळे आपण आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि परतावा गुंतवणूकीसाठी योग्य ताळमेळ बसवू शकतात. याचा फायदा असा आहे की जर शेवटी आपल्या उद्दिष्टानुसार रक्कम कमी पडली तर मालमत्ता वाटपाद्वारे त्यास दूर केले जाऊ शकते.

बाजारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती?

खरतर जास्तीत जास्त लोक बाजारात गुंतवणूक करण्यापासून लांबच राहतात कारण त्यांना गुंतवणूक कशी करावी याबाबत काहीच माहित नसते. दुसरे म्हणजे गुंतवणुकीसाठी पर्याप्त पैसे उपलब्ध नसतो. तिसरे म्हणजे जेव्हा आपण आपल्या लॉन्ग टर्म गोल (Long Term) बद्दल विचार करतो तेव्हा त्या रकमेला घेऊन आपण चिंताग्रस्त असतो की आपण इतकी रक्कम जमवू शकत नाही. परंतु आपण जर योग्य वेळेस गुंतवणुकीला सुरुवात केली आणि योग्य मालमत्तेचे वाटप केले तर हा भेडसावणारा प्रश्न निकाली लागू शकतो.

आपला उद्देश समोर ठेऊन महागाईकडे लक्ष देणे महत्वाचे असते

आपलयाला आधी हे माहित असणे आवश्यक आहे की काही लक्ष्ये ही सर्वांसाठी सामान्य असतात. शॉर्ट टर्म गोल (Short Term Goals) हे आपल्या नजीकच्या भविष्यातील खर्च असतो. समजा पुढच्या वर्षी मुलाला फी भरावी लागणार असेल तर ते शॉर्ट टर्म गोल होते. ३, ५ अथवा यापेक्षा जास्त वर्षांसाठी मीडियम टर्म गोल असतो. तसेच लॉन्ग टर्म गोल मध्ये मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न किंवा आपल्या निवृत्तीसाठीच्या योजना असतात. आपण आपले गोल निश्चित करताना महागाईबद्दल देखील काळजी घेणे गरजेचे असते जेणेकरून आपल्याला आवश्यक असलेल्या आणि आपण संकलित केलेल्या रकमेमध्ये कोणताही फरक असू नये.

म्युच्युअल फंड सर्वात सोपे साधन

सध्या मार्केटमधील सर्वात सोपे गुंतवणूकीचे साधन म्हणजे म्युच्युअल फंड (Mutual Fund) होय. येथे बरेच पर्याय, लवचिकता आणि कर लाभ आहेत. प्रोफेशनल फंड मैनेजर आपली रक्कम व्यवस्थापित करतात. कमीतकमी आपण त्यात दरमहा ५०० रुपये गुंतवू शकतो. म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी सर्व प्रकारचे निराकरण करत असतात.

म्युच्युअल फंडात येथे करू शकता गुंतवणूक

जर आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकडे यासाठी बरेच पर्याय आहेत. यामध्ये अ‍ॅक्सिस ब्लूचिप फंड, कोटक ब्लूचिप फंड, एसबीआय फोकस इक्विटी, मिराए एसेट लार्ज कॅप, एक्सिस फोकस्ड २५ फंड, मोतीलाल ओसवाल मिडकॅप ३०, कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप, एचडीएफसी मिडकॅप ऑप, कोटक इमर्जिंग इक्विटी, अ‍ॅक्सिस लॉन्ग टर्म इक्विटी, मिरा अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर, कोटक टॅक्स सेवर फंड यांचा समावेश आहे. परंतु आपल्याला गुंतवणूक करण्यापूर्वी या पर्यायांचे योग्य रीतीने संशोधन करणे गरजेचे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/