Investment Tips | चाळीशी ओलांडली असेल तरीसुद्धा बचतीसाठी झालेला नाही उशीर, केवळ ‘या’ गोष्टींकडे लक्ष देऊन बनवू शकता मोठा फंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Investment Tips | सामान्यत: लोक 20 – 30 वर्षांच्या दरम्यान कमाई सुरू करतात परंतु 40 वर्षानंतर भविष्यासाठी बचत सोडून देतात. यातून सर्वात मोठी अडचण अशी आहे की, जवळपास 15 – 20 वर्षे काम करूनही तुमच्याकडे बचतीच्या नावाखाली काहीच नसते आणि आता तुम्ही अस्वस्थ होऊ लागता. अशावेळी अनेक वेळा लोक अनेक चुकीची गुंतवणूक करून स्वत:वरील कर्ज वाढवतात. (Investment Tips)

 

मात्र, वयाच्या 40 नंतर गुंतवणूक करणे पहिल्या दृष्टीक्षेपात दिसते तितके वाईट नाही. साहजिकच तुम्हाला थोडा उशीर झाला आहे पण खूप उशीर झालेला नाही की तुम्ही तुमच्या निवृत्तीसाठी बचत करू शकत नाही. त्यामुळे घाबरू नका आणि सुज्ञपणे नियोजन करा.

 

40 च्या पुढे गुंतवणुकीसाठी तुमच्या बाजूने या गोष्टी
अर्थातच तुम्ही थोडे मागे आहात पण तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या 40 च्या पुढे सुद्धा तुमच्या बाजूने असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पगार 23 – 24 वयोगटाच्या तुलनेत खूप जास्त असतो.

म्हणजेच, आपण बचतीवर अधिक पैसे खर्च करू शकता. याशिवाय, तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी 15 – 20 वर्षे असतात आणि अधिक गुंतवणूक करून तुम्ही तेवढ्याच वेळेत चांगले भांडवल निर्माण करू शकता.

तसेच, जर तुम्ही तुमच्या विसाव्या वर्षी कर्ज घेतले असेल, तर तेही आतापर्यंत फिटलेले असेल. हा अतिरिक्त पैसा गुंतवणूक वाढवण्यासाठीही वापरता येतो.

पगारासह गुंतवणूक वाढवा
जसे तुमचे उत्पन्न वाढत आहे, तशीच तुमची गुंतवणूकही वाढली पाहिजे. दरवर्षी तुमच्या एसआयपीमध्ये थोडी वाढ करा.
हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भविष्यात तुमचा पोर्टफोलिओ किती वाढेल.
याशिवाय, तुमचा बोनस आणि इतर इन्सेटिव्हचा काही भाग गुंतवत रहा. तुम्हाला रिटर्नपेक्षा बचतीवर जास्त भर द्यावा लागेल. (Investment Tips)

 

कुठे गुंतवणूक करावी
एक किंवा दोन लॉर्ज कॅप इंडेक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करा. तुम्ही निफ्टी किंवा सेन्सेक्सवर आधारित कोणताही फंड निवडू शकता.
तुम्ही दोन्ही निर्देशांकांवर आधारित 1 – 1 फंड देखील निवडू शकता.
याशिवाय, तुम्ही मिडकॅप फंड, आंतरराष्ट्रीय फंड आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.
मात्र, सुरुवातीला ते इतके महत्त्वाचे नाही.

 

आर्थिक सल्लागाराची मदत घ्या
जेव्हा तुम्ही 20 – 30 वयोगटात असता तेव्हा तुमचा जोखीम घेण्याचा काळ असतो.
पण 40 नंतर, प्रयोग करण्याऐवजी, आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

 

Web Title :- Investment Tips | not so bad to start saving after 40 just keep these few things in mind sip personal finance

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा