कारमध्ये ‘ब्लूटूथ’द्वारे बोलत असाल तर ‘नो-टेन्शन’, पोलिस देखील काही नाही करू शकणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता जर कारमध्ये बसून तुम्ही ब्लूटूथने फोनवर बोलत असाल तर चंदीगड पोलीस तुमची पावती करून तुम्हाला दंड आकारू शकत नाही. याबाबतचे आदेश देखील पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. ट्राफिक पोलिसांनी यावर अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे.

नोटीफिकेशनमध्ये केले स्पष्ट
चंडीगडचे एस.एस.पी. शशांक शेखर आनंद यांनी स्पष्ट केले आहे की, नव्या वाहन दुरुस्ती कायद्यानुसार गाडी किंवा कारमध्ये जर ब्लूटूथ आधीच दिलेले असेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर बोलत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.

मात्र जर एखादा व्यक्ती दुचाकीवर किंवा कारमध्ये फोन कानाला लावून बोलत असेल तर त्याला दंड भरावा लागेल. नव्या वाहन कायद्यमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेले आहे की, ब्लूटूथच्या माध्यमातून बोलत असाल तर दंड भरावा लागणार नाही. यामुळेच ट्राफिक पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नवीन कायद्यानंतर देखील अनेकांकडून वसूल केला आहे दंड
याबाबत लवकरच पोलीस एक स्पष्टीकरण देखील देणार आहे. कारण नवीन मोटार कायदा आल्यानंतर देखील पोलिसांनी ब्लूटूथने फोनवर बोलणाऱ्या अनेकांकडून दंड वसूल केलेला आहे.

काही जागरूक नागरिकांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत विचारले होते की, ब्लूटूथने बोलल्यावर पोलीस जर दंड घेत असतील तर मग कार किंवा दुचाकीवर जीपीएस लावून सतत त्याकडे पाहून प्रवास करणाऱ्यांवर दंडाची कारवाई का नाही ? त्यामुळे आता या आधी पोलिसांनी वसुल केलेल्या दंडाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

एस.एस.पीनी सांगितले चालकांनी फोन टाळावे
ब्लूटूथने बोलताना जरी दंड आकारला जाणार नसला तरी वाहन चालकांनी मोबाईल वापरणे टाळावे तसेच ब्लूटूथचा देखील कमी वापर करावा. जेणेकरून स्वतःसोबत रस्त्यावरील इतरांचा जीव देखील टांगणीला लागणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like