INX Media Case : CBI नं दाखल केलं ‘चार्जशीट’, पी. चिदंबरम यांच्यासह ‘या’ 14 जणांचा आरोपपत्रात समावेश

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – आयएनएक्स मिडिया प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने आपले आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात माजी गृहमंत्री पी चिंदबरम यांच्यासह 14 जणांवर आरोप लावले आहेत. या प्रकरणी दिल्ली न्यायालयामध्ये 21 ऑक्टोबरला सुनावणी होईल.

सीबीआयच्या आरोपपत्रात पीटर मुखर्जी, कार्ति चिंदबरम, भास्कर, पी चिदंबरम, सिंधुश्री खुल्लर, अनूप पुजारी, प्रबोध सक्सेना, आर प्रसाद, आयएनएक्स मिडिया, एएससीएल आणि शतरंज प्रबंधन यांचे नाव आहे. आरोप पत्रात अर्थमंत्रालयाच्या 4 माजी अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे.

माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या समस्या कमी होताना दिसत नाही, दिल्लीच्या राऊज एवेन्यू न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ केली आहे. चिदंबरम 24 ऑक्टोबरपर्यंत सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात असतील, त्यांना आता 24 ऑक्टोबरला न्यायालयात हजर करण्यात येईल.

काय आहे प्रकरण –
अर्थमंत्री असतानाच्या कार्यकाळात आयएनएक्स मिडियाला परराष्ट्रीय गुंतवणूक संवर्धन बोर्डकडून मंजूरी मिळवून दिल्याच्या कथित प्रकरणात चिदंमबरम यांना 21 ऑगस्टला ताब्यात घेण्यात आले होते, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी