चिदंबरम यांच्या चौकशी संदर्भात CBI ने मागवले 6 देशांकडून पुरावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने चिदंबरम यांच्या बँक खात्यांचा तपशील ६ देशांकडून मागवला आहे. चिदंबरम यांची विदेशात बरीच अघोषित मालमत्ता, बँक खाती व देयके आहेत. त्याचे सर्व आवश्यक पुरावे व कागदपत्रे त्या देशांकडून मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत असे सीबीआयचे म्हणणे आहे. सध्या पी. चिदंबरम सुनावणी प्रकरणात दावे आणि प्रतिवाद चालू आहे. पुराव्याअभावी कोर्टाला एका ठराविक मर्यादेपलीकडे पोहोचण्यात अडचण येत आहे.

बनावट कंपन्यांविरूद्ध पुरावे मिळण्याच्या प्रतीक्षेत
चिदंबरम यांच्या खात्याचा तपशील सीबीआय ने ६ देशाकडे मागितला आहे. चिदंबरम यांच्या बनावट कंपन्यांविरोधात पुरावे अजून मिळाले नाहीयेत. आत्तापर्यंत चिदंबरम यांच्या विदेशात असलेल्या शेल कंपन्या, आयएनएक्स मीडिया आणि कार्ती चिदंबरम यांचा कंपन्यांमधील पैसा या बाबतही प्रश्न विचारले जात आहेत. आतापर्यंत सीबीआयला या शेल कंपन्यांविरोधात मिळालेले पुरावे तुकड्या तुकड्यात विभागलेले मिळाले आहेत. त्यांच्या ठोस पुष्टीकरणासाठी सीबीआयने स्वित्झर्लंड, सिंगापूर, ब्रिटन आणि बर्मुडा सोबत ६ देशांना न्यायालयीन विनंत्या पाठवल्या आहेत, जेणेकरुन या व्यवहाराची पुष्टी होऊ शकेल. हे सिद्ध झाल्यास, बनावट कंपन्यांविरूद्ध कार्ती चिदंबरम हाच चिदंबरम यांना आरोपी शाबीत करण्यासाठी मोठा पुरावा ठरणार आहे.

पी. चिदंबरम यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी अनेक वेळा कोर्टाला सांगितले की, जर कोणतेही परदेशी खाते किंवा परदेशातून पैसे भरल्याचा पुरावा तपास एजन्सीसमोर आला असेल तर आम्ही आपला जामीन अर्ज मागे घेऊ आणि सोबतच खटल्याचा सामना करू.

आत्तापर्यंत चिदंबरम यांची २६ तास चौकशी
यापूर्वी सोमवारी सीबीआय आणि चिदंबरम यांच्या वकिलांमध्ये दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टातील आयएनएक्स मीडिया प्रकरणात बरेच वाद-विवाद झाले होते. न्यायालयात सीबीआयकडे हजर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, चिदंबरम कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. वास्तविक, जेव्हा सीबीआयने चिदंबरम यांचा आणखी ५ दिवसांचा रिमांड वाढवून मागितला, तेव्हा चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी त्याला विरोध केला. सिब्बल म्हणाले की, सीबीआय ज्या कागदपत्रांच्या आधारे आमचा अशिलाला ताब्यात घेत असलेले सर्व पुरावे कोर्टासमोर ठेवावेत. सिब्बल म्हणाले की, चिदंबरम यांची २६ तास चौकशी झालेली आहे. पुराव्याच्या अभावी एवढी चौकशी करण्याची गरज नाही.

आरोग्यविषयक वृत्त –