INX Media Case : पी. चिदंबरम यांना ED कडून अटक, चौकशींनंतर कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून आज अटक करण्यात आली. दिल्लीतील तिहार तुरुंगातून ईडीने चिदंबरम यांना ताब्यात घेतले. या अटकेआधी जवळपास तासभर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. आयएनएक्स मीडिया प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली असून ते सध्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात आहेत.


ईडीच्या पथकाने आज सकाळी पी चिदंबरम यांच्याकडे एक तास चौकशी केली. यावेळी त्यांचा मुलगा कार्ती हा देखील आपली आई नलिनीसह तुरुंगात पोहोचला. न्यायालयाने ईडीला पुराव्यांच्या आधारे चिदंबरम यांना अटक करण्याची परवानगी दिली होती.त्यामुळे जर त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आणि चौकशीत काही चुकीचे आढळल्यास ईडीला अटक करण्याचा आधिकार असल्याचे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी म्हटले होते.


त्यामुळे चिदंबरम यांना अटक करण्यात ईडीला कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. त्याचबरोबर मी केवळ माझ्या वडिलांना भेटण्यासाठी तुरुंगात आल्याचे यावेळी त्यांचा मुलगा कार्ती याने सांगितले. तसेच हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप देखील त्याने केला आहे.

सीबीआय अपमान करत आहे
जामिनासाठी अर्ज करून देखील सीबीआय आपला अपमान करण्यासाठी आपल्याला तुरुंगात ठेवू इच्छित असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी