INX Media Case : चिदंबरम यांना दिलासा नाही, दिल्ली हायकोर्टानं जामीनाची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या जामिनावर आज दिली हायकोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणी न्यायालयाने चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तिहार जेलमध्ये बंद आहेत.

दिल्ली हायकोर्टात त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी त्यांनी बचाव करताना म्हटले होते कि, या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे हि तपास यंत्रणांकडे असून यामध्ये फेरफार करणे शक्य नाही. ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध करताना म्हटले होते कि, ते बाहेर आल्यानंतर पुरावे तसेच साक्षीदारांना प्रभावित करू शकतात. ईडीच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले कि, चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप असून हा एक दुर्मिळ घोटाळा आहे.

चिदंबरम यांच्यावर आहे मनी लॉन्ड्रिंगचा आरोप –

74 वर्षीय चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक केली होती. सध्या आणखी एका दुसऱ्या प्रकरणात ईडीच्या ताब्यात असून सीबीआयने त्यांच्याविरोधात याप्रकरणी 15 मे 2017 रोजी एफआयआर दाखल केली होती. 2007 मध्ये आयएनएक्स मीडिया प्रकरणात 305 कोटी रुपयांचा विदेशी फंड घेताना यासाठी परवानग्या घेताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Visit : Policenama.com