निषेध करण्यासाठी मी ‘जंतर-मंतर’वर धरणे आंदोलन करील : कार्ती चिदंबरम

चेन्नई : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. चिदंबरम यांच्या अटकेनंतर पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नईवरुन दिल्लीला जाण्यापूर्वी कार्ती यांनी चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस पक्षाची आणि पी. चिंदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा सरकारचा डाव आहे. याचा निषेध करण्यासाठी मी जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करील असे कार्ती चिदंबर यांनी म्हंटले आहे.

कार्ती म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाची आणि पी. चिंदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा सरकारचा डाव आहे. माझ्या वडिलांनाच नाही तर संपूर्ण कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले जात आहे. जंतर-मंतरवर मी याचा निषेध करेन. याप्रकरणाला विनाकारण मोठं बनविण्यात आलं आहे, ज्यामध्ये चिदंबरम यांचा काहीही संबंध नाही. मलाही सीबीआयने 4 ते 5 वेळा नोटीस बजावली होती. तब्बल 10 ते 12 तास मी सातत्याने चौकशीला गेलो आहे. मात्र, अद्याप माझ्याविरुद्ध कुठलंही दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही. त्यामुळे, आम्ही कायदेशीर आणि राजकीय मार्गाने आमचा लढा सुरूच ठेऊ असे कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे.

कार्ती चिदंबरम आज चेन्नईहून दिल्लीला पोहोचले आहेत. सरकार सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांना अडकविण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –