INX Media Case : मोबाईल स्वीच ऑफ करून भररस्त्यात ड्रायव्हर, क्लार्कला खाली उतरवरून ‘गायब’ झाले पी. चिदंबरम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा आयएनएक्स मीडिया’शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणी जामीन फेटाळल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची भीती आहे. मात्र अटकेच्या भीतीने ते बेपत्ता झाले असून त्यांचा फोन देखील बंद लागत आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक त्यांचा शोध घेत असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचदरम्यान एक नवीन खुलासा झाला असून काल संध्याकळपासून ते गायब असून त्यांनी आपल्या ड्रायव्हरला आणि क्लार्कला मध्येच रस्त्यात सोडून गेल्याचा खुलासा झाला आहे. त्यानंतर त्यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून अजूनपर्यंत तो सुरु झालेला नाही. त्यांना ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक त्यांचा शोध घेत असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र अजूनपर्यंत त्यांना तपास लागला नसून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर त्यांना सुप्रीम कोर्टानेही दिलासा दिला नसून त्यांच्यावरील अटकेची तलवार कायम आहे. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी आणि सरकारी संस्थांनी त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस काढली असून सर्व विमानतळांवर सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशाबाहेर पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी होणार आहे. आयएनएक्स मीडियाच्या प्रकल्पाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी मिळत नव्हती. यामुळे त्यांनी पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी चिदंबरम यांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी या प्रकरणात चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याने 10 लाख रुपयांची लाच मागितल्याचे देखील त्यांनी चौकशीत माहिती दिली होती. 2007 मधील हे प्रकरण असून त्यावेळी चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते.

दरम्यान, या मोठ्या खुलाश्यानंतर आता केंद्रीय संस्था काय निर्णय घेतात तसेच सरकार काय पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.