‘jio Giga Fiber’ ला ‘Hathway’ देणार ‘टक्कर’ ! 549 रुपयात मिळणार 125 MBPS ‘स्पीड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Giga Fiber ला टक्कर देण्यासाठी आता लोकल ठिकाणी इंटरनेटची सेवा देणाऱ्या Hathway ने देखील आपल्या इंटरनेट ब्रॉडबँड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी Hathway ने तयारी सुरु केली आहे. हाथवेने अनलिमिटेड प्लॅन्सच्या किंमतीत आणि स्पीड दोन्हीत बदल केले आहेत.

यातील अनेक प्लॅन जास्त कालावधीचे असण्याची शक्यता आहे. यात आता थेट ६ महिन्यांचा प्लॅन सहभागी करण्यात आला आहे. यात Hatway ने दरमहाच्या प्लॅनच्या किंमती देखील सादर केल्या आहेत. यात डाटा वापराची कोणतीही सीमा ठरवण्यात आलेली नाही.

jio Giga Fiber ला Hathway टक्कर –

– याच सर्वात सर्वात प्लॅन आहे हिरो प्लॅन. यात ५० Mbps डाटा स्पीड मिळते याची मासिक किंमत आहे ३४९ रुपये. यात गोल्ड आणि ब्लास्ट पॅक देखील उपलब्ध आहे. ज्यात ३९९ रुपये आणि ४९९ रुपये डाटा प्रतिमहिना किंमतीला मिळेल.
– याशिवाय सुपर प्लॅनमध्ये २५ Mbps च्या स्पीड देण्यात येतो. याची किंमत ३४९ रुपये किंवा ३९९ रुपये असणार आहे.
– यात एक लाइटनिंग प्लॅन आहे. ज्या ५० Mbps नेटवर्क स्पीड मिळेल. यात तीन रेंटल पर्याय आहे. ज्यात ३४९ रुपये, ३९९ रुपये आणि ४४९ रुपये उपलब्ध आहे.
– याशिवाय ८० Mbps चा स्पीड असलेला रॅपिड प्लॅन आहे, यात ३४९ रुपये, ३९९ रुपये आणि ४९९ रुपये किंमतींना उपलब्ध आहेत.
– यात हाय स्पीड असणारे फ्रीडम प्लॅन आणि थंडर प्लॅन देखील असणार आहे. फ्रीडम प्लॅनमध्ये १०० Mbps चा स्पीड मिळेल. यात तीन पर्याय असतील. याची किंमत ४९९ रुपये, ५४९ रुपये आणि ५९९ रुपये असेल.
– थंडर प्लॅनमध्ये १२५Mbps चा स्पीड ऑफर करण्यात आला आहे. या देखील तीन पर्याय असतील. याची किंमत ५४९ रुपये, ५९९ रुपये, ६४९ रुपये असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त