Jio SIM च्या फोनमध्ये ‘नेटवर्क’ नसताना देखील CALL करू शकता तुम्ही, ‘या’ 150 स्मार्टफोनवर ‘सर्व्हिस’ उपलब्ध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम अशी मोफत सेवा ‘Wifi Calling’ देत आहे. ही एक अशी सुविधा आहे, ज्याद्वारे ग्राहकांना नेटवर्कशिवाय देखील कॉल करता येऊ शकतो. नुकतीच जिओने ही सुविधा लाँच केली आहे, जेणेकरुन ग्राहक त्यांच्या जिओ नंबरवर Wi-Fi मोडमध्ये स्विच करू शकतील आणि विनामूल्य व्हॉईस कॉल करतील.

Jio VoWiFi म्हणजेच Wi-Fi कॉलिंगमध्ये ग्राहकांना आपल्या घरात आणि कार्यालयात व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलसाठी Wi-Fi वर स्विच करण्यात सक्षम होईल.

Jio Wifi कॉलिंगचे फायदे

वायफाय वर ग्राहक सहजरित्या आणि कोणत्याही अडचणीशिवाय व्हिडीओ कॉल आणि व्हॉइस कॉल करू शकणार आहेत.

पूर्ण भारतातून कुठूनही कॉल करता येऊ शकतो.

डेटा नेटवर्क गेल्यावरही नेहमी मित्रांसह संपर्कात राहणे शक्य आहे.

ही सेवा कोणत्याही वायफाय नेटवर्कवर काम करते.

जिओची ही सुविधा देशभरातील जवळपास १५० स्मार्टफोनवर उपलब्ध करण्यात आली आहे. जाणून घेऊया पूर्ण लिस्ट…

– Apple : iOS13 ला सपोर्ट करणारे सगळ्या आयफोन्स (iPhone) मध्ये ही सुविधा आहे. म्हणजे iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max, iPhone 7 and iPhone 7 Plus, iPhone 8 आणि iPhone 8 Plus, iPhone 6S, iPhone 6S Plus, iPhone SE, iPhone XR, iPhone X, iPhone XS and the iPhone XS Max वरून वायफाय कॉलिंग करता येते.

– Coolpad : CoolPlay 6, Mega 5C आणि Mega 5

– Google : Pixel 3,Pixel 3XL च्या ऐवजी Pixel 3A आणि Pixel 3A XL

– Infinix : Infinix Hot 7 Pro, Infinix Smart 3 Plus, Infinix Hot 6 Pro आणि Infinix S4.

– iTel S42

– Lava : Lava Z61, Lava Z92, Lava Z60s आणि Lava Z81.

– Mobiistar : Mobiistar C1, Mobiistar C1 Shine, Mobiistar C2, Mobiistar X1 Selfie आणि Mobiistar X1 Notch

– Motorola : Moto G6

– Tecno : Tecno Camon i4, Tecno Camon iSKY 3 आणि Tecno Camon iTwin

– Xiaomi : Redmi K20 series, Poco F1, Redmi 7, Redmi 7A, Redmi Note 7 Pro आणि Redmi Y3 सहित Redmi Note 8 Pro

– Vivo : Vivo V11, Vivo V11 Pro, Vivo V15, Vivo V15 Pro, Vivo V9, Vivo V9 Pro, Vivo 1904, Vivo Y81, Vivo Y81i, Vivo Y91, Vivo Y91i, Vivo Y93, Vivo Y95, Vivo Y15, Vivo Y17, Vivo Y91 आणि Vivo Z1 Pro.

– Samsung : सॅमसंगच्या दोन-तीन वर्षांत लाँच झालेल्या बर्‍याच फोनला थेट वायफाय कॉलिंगचा सपोर्ट मिळतो. या यादीमध्ये Galaxy J4 (2018), Samsung A10, Samsung A10S, Galaxy A30s, Galaxy A5 (2017), Galaxy A50s, Galaxy A70, Galaxy A8 Star, Galaxy A8+, Galaxy A80, Galaxy C9 Pro, Galaxy A20, Galaxy A30, Galaxy A5 (SM-A500G), Galaxy A5 (2016), Galaxy A6, Galaxy A6+, Galaxy A7, Galaxy A7 (2018), Galaxy A7 (2016), Galaxy A8, Galaxy A9 (2018), Galaxy A9 Pro, Galaxy C7 Pro, Galaxy Core Prime 4G, Galaxy J1 (2016), Galaxy J2, Galaxy J2 (2018), Galaxy J2 Ace, Galaxy J2 Hybrid Tray, Galaxy J3, Galaxy J3 Pro, Galaxy J4+, Galaxy J5, Galaxy J6, Galaxy J6+, Galaxy J7, Galaxy J7 Duo, Galaxy J8, Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M40, Galaxy Note 4, Galaxy Note 4 Edge, Galaxy Note 5, Galaxy S10, Galaxy S10 Plus, Galaxy S10e, Galaxy S6, Galaxy S6 Edge, Galaxy S6 Edge Plus, Galaxy J2 (2016), Galaxy J2 Pro, Galaxy J5, Galaxy J5 Prime, Galaxy J7, Galaxy J7 Max, Galaxy J7 Nxt, Galaxy J7 Prime, Galaxy J7 On Nxt, Galaxy J7 Pro, Galaxy Note 10, Galaxy Note 10+, Galaxy Note 5 Duos, Galaxy Note 8, Galaxy On 5 Pro, Galaxy On 7 Pro, Galaxy On 8, Galaxy On 6, Galaxy On 7 Prime, Galaxy On 8, Galaxy S7, Galaxy S7 Edge, Galaxy S8, Galaxy S8+ आणि Galaxy S9, Galaxy S9+ यामध्ये समाविष्ट आहेत.

Android वापरकर्ते अशा पद्धतीने सक्रिय करू शकतात jio wifi कॉलिंगची सुविधा

– अँड्रॉइड स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांना सर्वात आधी सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे त्यांना कनेक्शनचा पर्याय मिळेल, ज्यामध्ये त्यांना वाय-फाय कॉलिंगचा पर्याय चालू करावा लागेल, त्यानंतर ही सुविधा चालू होईल.

iOS वापरकर्ते कशी सक्रिय करणार ही सुविधा

– iOS स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांनी प्रथम त्यांच्या फोनमधील सेटिंग्जवर जावे. येथे जाऊन फोन पर्यायावर जा आणि वायफाय कॉल करण्याचा पर्याय शोधून त्याला चालू करा.

– वापरकर्त्यांना अधिक अनुभवासाठी VoLTE आणि Wi-Fi Calling अशा दोन्ही पर्यायांना चालू ठेवावे लागेल.