Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं गॅस सिलेंडरसाठी ‘धावपळ’ नको, देशात पुरेसा साठा उपलब्ध : IOC

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळेदेशभरात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तीन आठवड्यांचा लॉकडाऊन काळापेक्षाही जास्त दिवस पुरेल इतका पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस साठा असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे चेअरमन संजीव सिंह यांनी दिली आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात इंधन पोहोचले आहे. त्यामुळे 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळात ग्राहकांनी एलपीजी गॅस रिफिल करण्यासाठी गर्दी करू नये.

‘संपूर्ण एप्रिल महिना आणि त्यापुढेही पुरेल एवढ्या इंधनाचा आराखडा आम्ही तयार केला आहे. या इंधनाच्या मागणीसाठी सर्व ठिकाणी रिफायनरी कार्यरत आहेत. ज्याठिकाणी बल्क स्टोरेज पॉईंट्सशिवाय, एलपीजी केंद्र आणि पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणेच काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारच्या इंधनाची कमतरता नाही आहे.’देशभरात झालेला लॉकडाऊनमुळे मोठे उद्योग ठप्प झाले आहेत, फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत, ट्रेन्स थांबल्या आहेत आणि जवळपास सर्वच महत्त्वाच्या हालचालींवर बंधन आली आहेत. याचा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि अव्हिएशन टर्बाइन फ्युएल (-ढऋ) या इंधनाच्या मागणीवर झाला आहे. या इंधनांच्या मागणीत घट झाली आहे. कमीत कमी गाड्या रस्त्यावर धावत असल्याने ही घट झाली आहे. मार्चमध्ये पेट्रोलची मागणी 8 टक्क्यांनी तर डिझेलची मागणी 16 टक्क्यांनी कमी झाली आहे. अशी माहिती सिंह यांनी दिली आहे.