महाराष्ट्रात IOCL मध्ये अप्रेंटिसशीपच्या 297 पदांसाठी भरती, जाणून घ्या

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जवळजवळ ३६४ टेक्निकल तर १३६ नॉन टेक्निकल ट्रेड अप्रेंटिसशीप अशी एकूण ५०० पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या ५०० पदांपैकी २९७ पदे ही महाराष्ट्रातील आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २० मार्च २०२० पर्यंत असणार आहे. तर परीक्षा २९ मार्च २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हील, इन्स्ट्रूमेंटेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशिअन अशा १९० पदांची भरती होणार आहे तर ३० पदे ही फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशिअन, मशीनीस्ट आणि इंस्ट्रुमेन्टची आहेत. तर फ्रेशर्स असलेल्यांना डेटा एन्ट्री ऑपरेटर्स म्हणून घेण्यात येणार आहे. यापैकी फ्रेशर्सला एकूण ९ पदे आहेत तर स्कील सर्टिफिकेट होल्डर्सना एकूण ९ पदे आहेत.

शैक्षणिक योग्यता –

विविध पदांच्या योग्यतेनुसार संबंधित शाखेतील डिप्लोमाधारक, आयटीआय व अन्य शैक्षणिक पात्रता संकेतस्थळावर विस्तृतपणे पाहता येईल.

अर्ज कुठे करावा?

इंडियन ऑइलच्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्राशिवाय मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगडमध्ये देखील ही अप्रेंटिसशीप भरती होणार आहे.

खालील अ‍ॅड्रेस सर्च करून अधिकृत नोटिफिकेशन पाहता येणार आहे.

https://www.iocl.com/PeopleCareers/PDF/Engagement_of_Technical_and_Non_Technical_Trade.pdf

You might also like