Apple iPhone 12 ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, फोनमध्ये नाही मिळणार ‘हे’ महत्वाचे फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या लोकांना Apple चे उत्पादन आवडते, त्यांना दुप्पट धक्का बसू शकतो. एकीकडे आयफोनच्या लॉन्चिंगमध्ये सतत विलंब होत आहे, त्यामुळे आयफोन युजर्स निराश आहेत. तीच कंपनी आता युजर्सना दुहेरी धक्का देऊ शकते. कारण लीक झालेल्या अहवालाचा हवाला देताना असे म्हटले जात आहे की, आगामी आयफोन १२ सीरिजमध्ये 120Hz फास्ट रिफ्रेश्ड रेट डिस्प्ले मिळणार नाही. आयफोन १२ सीरिजच्या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत ७५,००० रुपये असू शकते. Apple ऑक्टोबरमध्ये आयफोन १२ सीरिज सुरू करू शकतो.

नाही मिळणार 120Hz रिफ्रेश्ड रेट डिस्प्ले
Apple विश्लेषक Ming-Chi Kuo ने खुलासा केला आहे की, आयफोन १२ सीरिजला 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केले जाणार नाही. यामागे बॅटरी लाईफ हे कारण असल्याचे मानले जात आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की, 120Hz रीफ्रेश रेटसह फोनची बॅटरी जास्त असेल. परिणामी कंपनी २०२१ पर्यंत चांगल्या बॅटरी लाइफसह नवीन आयफोन १२ मध्ये 120Hz रीफ्रेश रेट ऑफर देईल. दुसर्‍या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आयफोन १२ सीरिजचे काही मॉडेल्स 60Hz रिफ्रेश रेट दिले जातील. तसेच काही प्रीमियम मॉडेल्समध्ये 90Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळेल.

काय आहे 120Hz चा फायदा?
आयफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळाल्याने फोनचा स्पीड वाढतो. तसेच गेम्स खेळताना फोनमध्ये एक चांगला अनुभव मिळेल. म्हणजे गेम खेळत असताना फोन लॅग होणार नाही. सध्या बरेच स्मार्टफोन ब्रँड त्यांच्या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देतात. मात्र आयफोन युजर्ससाठी 120Hz रिफ्रेश्ड रेट डिस्प्लेसाठी पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तसेच Apple च्या नवीन आयफोन १२ प्रो मध्ये LiDAR सेन्सर दिला जाऊ शकतो. टिप्सटर Jon Prosser ने ट्वीट करत याचा खुलासा केला आहे.