IPL साखळी सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था – बहुप्रतीक्षित IPL स्पर्धेला २३ मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र IPL चं उर्वरित वेळापत्रक हे लोकसभेच्या निवणुकांचा नियोजित कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घोषित करण्यात येणार होते. त्यानुसार आज BCCI आज साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकांमुळे IPL चे सामने देशाबाहेर खेळवण्याचा विचार होता. मात्र, अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यावर एकमत झाले आहे.  अकराव्या हंगामाचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामाची सुरुवात करणार असून त्यांचा सामना रॉयल चँलेंजर्स बंगळुरु संघाशी होणार आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक, प्ले ऑफ्सचे सामने आणि अंतिम सामना याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे.  त्यानुसार स्पर्धेतील साखळी सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us