‘हे’ चार भारतीय खेळाडू मिळवून देऊ शकतात दोघांपैकी एका संघाला फायनलचे तिकीट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आयपीएलचा बारावा हंगाम संपण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आणि सामने देखील दोनच उरले आहेत. मुंबई इंडियन्सने आगोदरच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आज दिल्ली आणि चेन्नई यांच्यात क्वालिफायर दोनचा सामना होणार आहे. यात जो संघ सामना जिंकेल तो, मुंबईशी आयपीएलमध्ये भिडणार आहे.

या सामन्यात बाकी खेळाडूंबरोबर सर्वात जास्त लक्ष असेल ते या चार भारतीय खेळाडूंवर. दोन्ही संघातील दोन दोन भारतीय खेळाडू असे आहेत जे त्यांच्या संघाला हा सामना एकहाती जिंकून देऊ शकतात. त्यामुळे या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर आज दोन्ही संघाच्या पाठिराख्यांचे लक्ष लागून असणार आहे .

हे चार खेळाडू पुढीलप्रमाणे :

१) महेंद्रसिंग धोनी : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी या हंगामात प्रचंड फॉर्ममध्ये आहे .त्याने एकहाती काही सामने त्याच्या संघाला जिंकून दिले आहेत तर काही सामने त्याच्या कर्णधारपदाच्या बळावर जिंकून दिले आहेत. धोनी नॉकआऊट सामन्यात आतापर्यंत १७ वेळा खेळला आहे. यात त्यानं ४५६ धावा केल्या आहेत. धोनीची सरासरी ४१. ४५ आहे तर, स्ट्राईक रेट १३०हून अधिक आहे.

२)रिषभ पंत : दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज आणि आक्रमक फलंदाज रिषभ पंत याच्या कामगिरीकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागून आहे . दिल्लीचा हा एकच खेळाडू संपूर्ण विरोधी संघावर भारी पडू शकतो. यंदाच्या हंगामात पंतनं जबरदस्त खेळी केली आहे. त्यानं १८० च्या स्ट्राईक रेटनं २८७ धावा केल्या आहेत.

३) हरभजन सिंग : त्याच्या देखील कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे भज्जीनं आतापर्यंत १२ नॉकआऊट सामने खेळले आहे. यात १४ विकेट घेतले आहेत.हरभजन सिंग चेन्नई सुपर किंग्जचा हा फिरकी गोलंदाज देखील या हंगामात फॉर्ममध्ये आहे.

४)अमित मिश्रा : चेन्नईकडे हरभजसिंग आहे तर, दिल्लीकडे लेग स्पिनर अमित मिश्रा आहे.त्यामुळे आता या दोघांपैकी आज कोण बाजी मारतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे . या हंगामात मिश्रानं १० सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ७ प्रति ओव्हरपेक्षाही कमी आहे.
त्यामुळे आजचा सामना मजेशीर आणि रंगतदार ठरणार यात काही शंका नाही.

You might also like