#IPL 2019 : चेन्नईसमोर मुंबईचे १५० धावांचे आव्हान

हैद्राबाद : वृत्तसंथा – आयपीएलच्या १२ व्या सिजनची आज फायनल होतेय. हैदराबादमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने आहेत. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर चेन्नईची गोलंदाजी आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले आहे.

या स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई ३ वेळा आमने सामने आले. पण तीनही सामन्यात मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. दोनही संघांकडे ३-३ IPL विजेतेपदं आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवत या स्पर्धेच्या विजेतेपदाचा चौकार कोण मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईकडून फिरकीपटू जयंत यादवला वगळण्यात आले असून त्या जागी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन याला संधी देण्यात आली आहे. चेन्नईच्या संघात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
डी कॉक – २९, रोहित शर्मा – १५, सुर्यकुमार यादव – १५, कृणाल पांड्या- ७, ईशान किशन – २३, हार्दिक पंड्या – १६, राहुल चाहर – ०, कायरन पोलार्ड – ४१, बुमरा – 0

You might also like