IPL 2019 : पराभवानंतर अजिंक्य रहाणेने आपल्याच खेळाडूंचे टोचले कान, म्हणाला..

माहोली : वृत्तसंस्था – दिवसेंदिवस निवडणुकांसह आयपीएलची मजाही वाढत आहे. काल पंजाब विरूद्ध राजस्थानचा समना चांगलाच रंगला. पंजाबने राजस्थानसमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानांचा पाठलाग करताना त्यांना फक्त १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने आपल्याच खेळाडूंचे कान टोचले आहेत.

१८२ धावांचे आव्हान हे पेलण्यासारखे होते. डावाची सुरुवातदेखील चांगली झाली होती. पण अशा प्रकारच्या आव्हानाचा पाठलाग करताना झटपट गडी बाद होणे योग्य नाही. गोलंदाजानी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांनी मात्र चुकांमधून बोध घ्यायला हवा, असं म्हणत झालेल्या चुकांमधून शिका असा सल्ला रहाणेने आपल्या खेळाडूंना दिला आहे.

तसंच आमच्या संघाला १८२ धावांचा पाठलाग करायचा होता. अशा वेळी आपण कोणालाही फारसा दोष देऊ शकत नाही. स्टुअर्ट बिन्नी याने उत्कृष्ट फटकेबाजी करत आशा पल्लवित केल्या होत्या. केवळ १-२ मोठ्या फटक्यांची गरज होती, असं म्हणत त्याने बिन्नीचे कौतुक केले आहे. तसंच गोलंदाजीत शेवटचे षटक आम्हाला महाग पडले. त्याचा परिणाम सामन्यावर झाला. त्रिपाठी मधल्या फळीत चांगली कामगिरी करू शकत नव्हता, त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्यात आले आणि मी चौथ्या क्रमांकावर खेळलो. पण आम्ही एकत्रित गडी गमावल्यामुळे सामना जिंकू शकलो नाही, असेही रहाणेने सांगितले.