IPL2019 : रोमांच, ड्रामा अन् मुंबई इंडियन्सने ‘असा’ घडवला इतिहास

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून आयपीएल २०१९ चे विजेतेपद पटकावले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईला ७ बाद १४८ धावाच करता आल्या. अटीतटीच्या या लढतीत १४ धावा देत २ बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

अखेरचे रोमहर्षक षटक :

▪ अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ९ धावांची गरज होती.
▪ लसिथ मलिंगाच्या पहिल्या चेंडूवर वॉटसनने १ धाव घेतली.
▪ दुसऱ्या चेंडूवर जडेजाने १ धाव घेतली.
▪ तिसऱ्या चेंडूवर वॉटसनने २ धावा काढल्या.
▪ चौथ्या चेंडूवर पुन्हा २ धावा घेण्याच्या नादात वॉटसन बाद झाला.
▪ पाचव्या चेंडूवर शार्दूल ठाकूरने २ धावा घेतल्या.
▪ शेवटच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज असताना शार्दूल ठाकूर पायचीत झाला.

मुंबईचा चौकार :
मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७ आणि आता २०१९ असे चार वेळा आयपीयलचे विजेतेपद पटकावले.

भरघोस इनामही घोषित :
विजेता आणि उपविजेता दोन्ही संघ काल मालामाल झाले. विजेत्या मुंबई संघाला २० कोटी तर उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला १२ कोटी ५० लाख इनाम म्हणून देण्यात आले.

विविध पुरस्कार मिळवणारे इतर खेळाडू :

१) ऑरेंज कॅप – पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरला ऑरेंज कॅपचा बहुमान मिळाला. १२ सामन्यात त्याने सर्वाधिक ६९२ धावा केल्या.यात १ शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश होता. त्याला १० लाखांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

२) पर्पल कॅप – चेन्नई सुपर किंग्सचा फिरकीपटू इम्रान ताहीर याने सर्वाधिक बळी घेत या पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्याने या पर्वात सर्वाधिक २६ बळी मिळवले. त्याला देखील १० लाखांच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

३) मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर : कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेल याला या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याला देखील १० लाखांच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

४) फेअरप्ले अवॉर्ड : सनराईजर्स हैदराबादने या पुरस्कारात बाजी मारली. १० लाख रुपये देऊन या संघाचा सन्मान करण्यात आला.

५) परफेक्ट कॅच ऑफ सिझन : मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्ड याने हा पुरस्कार पटकावला. १० लाखांचा पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आले.

६) सुपर स्ट्राईकर : कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेल याने हा पुरस्कार पटकावला. १० लाखांचा पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आले.

७) स्टाईलिश प्लेअर ऑफ सिझन : पंजाबच्या लोकेश राहुल याने हा पुरस्कार पटकावला. १० लाखांचा पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आले.

८) गेमचेंजर ऑफ सिझन : मुंबई इंडियन्सच्या राहुल चहर याने या पर्वातील हा पुरस्कार पटकावला. १० लाखांचा पुरस्कार देऊन त्याला गौरवण्यात आले.

९) सर्वात वेगवान अर्धशतक : मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्या याने हा पुरस्कार पटकावला. १७ चेंडूत अर्धशतक ठोकत त्याने या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

१०) इमर्जिंग प्लेयर : कोलकाता नाईट रायडर्सच्या शुभमन गिल याला हा पुरस्कार देण्यात आला.

You might also like