IPL सुरु होण्याआधी विराटला धक्का, स्टार गोलंदाज आयपीएलमधून OUT

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आयपीएलच्या 13 व्या सत्राला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. आता विराट कोहलीच्या नेतृ्त्वाखालीलली रॉयल चैलेंजर्स बँगलोर संघालाही झटका बसला असून त्यांचा स्टार खेळाडू आयपीएल स्पर्धेतून बाहेर गेला आहे .

आरसीबीचा स्टार गोलंदाज केन रिचर्ड्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामागे कौटंबीक कारण असल्याचे सांगितले जात आहे. आरसीबीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये आरसीबीने सांगितलेय की, रिचर्ड्सन लवकरच बाप होणार आहे. त्यामुळे तो कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितोय. त्यामुळेच त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. रिचर्ड्सनच्या जागी आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम जम्पाला संघामध्ये घेतले आहे.

28 वर्षीय रिचर्ड्सन 2016 मध्ये आरसीबीसोबत जोडला होता. 2020 मध्ये झालेल्या लिलावात आरसीबीने पुन्हा एकदा त्याच्यासोबत करार केला होता. आरसीबीने 2020मध्ये झालेल्या करारात रिचर्ड्सनला चार कोटी रुपयात खरेदी केले होते. तर जम्पा या लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्याची बेस प्राइस 1.5 कोटी रुपये होती. जंप्माच्या समावेशामुळे आरसीबीचा फिरकी विभाग मजबूत झाला आहे. संघाकडे आधीपासूनच युजवेंद्र चहल, मोइन अली आणि पवन नेगीसारखे दर्जेदार गोलंदाज आहेत.