MS धोनीच्या ‘कॅप्टन’शीपखाली विराट आणि रोहित ! ‘या’ तारखेला मुंबईत होणार सामना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चाहत्यांमध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाची उत्सुकता वाढली असून बीसीसीआयच्या वतीने या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात पहिला शुभारंभाचा सामना रंगणार आहे. IPL ची सुरुवात भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेनंतर 11 दिवसांनी होणार आहे. हि स्पर्धा 29 मार्च ला सुरु होईल आणि अंतिम सामना 17 मे ला खेळवला जाणार आहे.

मात्र IPL आधी चाहत्यांना एक वेगळी मज्जा पाहायला मिळणार आहे. यात आता एकाच वेळी 8 संघांमधील खेळाडू एकाच सामन्यात मैदानात उतरतील असा विचार केला आहे. IPL च्या इतिहासात प्रथमच असे होणार आहे की या स्पर्धेपूर्वी चॅरिटी सामना आयोजित केला जाईल. IPL चॅरिटी सामना 25 मार्च ला झालेल्या IPL सामन्याच्या अगोदर 3 दिवस खेळला जाऊ शकतो. यामध्ये सर्व दिग्गज खेळाडू एकत्र दिसणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.

BCCI चा प्लॅन

बीसीसीआय मीडिया रिपोर्टनुसार, आणि IPL गव्हर्निंग काउन्सिलने या चॅरिटी सामन्यासाठी दोन संघ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक संघ पूर्व आणि उत्तर भारत असेल आणि दुसरा संघ पश्चिम आणि दक्षिण भारत असेल. यामुळे एका संघात किंग्स इलेवन पंजाब, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकत्ता नाईट्स राइडर्सचे खेळाडू असतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या संघात मुंबई इंडियंस, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स आणि सनराइजर्स हैदराबादचे खेळाडू असतील. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा हा मास्टर प्लॅन आहे असे ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.

एकाच संघातून धोनी, विराट आणि रोहित खेळणार

या क्रिकेट संघात दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसणार आहे. या सामन्यात एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, जसप्रीत बुमराह, हरभजन सिंग, आणि लसिथ मलिंगासारखे दिग्गज एकत्र खेळताना दिसणार आहेत.

50 दिवस चालणार IPL

क्रिकबजनं सांगितलेल्या माहितीनुसार, या वर्षीचे सामने 29 मार्च ते 17 मे दरम्यान होणार आहेत. 44 दिवस IPL चा 12 वा हंगाम चालला होता, आणि तेरावा हंगाम 50 दिवस चालणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात या हंगामाचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना होणार आहे. दरम्यान, नॉकआऊट स्पर्धेचे वेळेपत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. राजस्थान रॉयल्स सोडून सर्व संघाचे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहेत. तर गुवाहटी येथे राज्यस्थान राॅयल्स संघाचे सामने होणार आहेत.