IPL 2020 : BCCI नं जारी केला आयपीएल प्ले ऑफचा कार्यक्रम, दुबईत होणार फायनल

पोलिसनामा ऑनलाइन – IPL 2020 : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने आयपीएल प्ले ऑफचा कार्यक्रम जारी केला आहे. आयपीएल 2020 चा फायनलचा सामना 10 नोव्हेंबरला दुबई इंटरनॅशल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. यासोबतच 5 नोव्हेंबरला आयपीएल2020 चा पहिला क्वालीफायर सामना खेळाला जाईल.

यानंतर एलिमिनेटर आणि दुसरा क्वालीफायर अबू धाबीमध्ये 6 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरला खेळवला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार 7 :30 वाजता सुरू होतील. तर महिला टी-20 चॅलेंज 4 से 9 नोव्हेंबरच्या दरम्यान शारजामध्ये आयोजत केले जाईल.

सुपरनोव्हाज, वेलोसिटी आणि ट्रेलब्लेजर्स चार, पाच आणि सात नोव्हेंबरला राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये तीन मॅच खेळवल्या जातील. पहिली, तिसरी आणि फायनल मॅच सायंकाळी 7 :30 वाजता खेळली जाईल. तर दुसरी मॅच दिवसा 3:30 वाजता खेळली जाईल.

आयपीएल 2020 च्या प्ले ऑफ मॅच –

पहिली क्वालीफायर – 5 नोव्हेंबर (दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम)

एलीमिनेटर – 6 नोव्हेंबर (अबु धाबीचे शेख जायद इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम)

दूसरी क्वालीफायर- 8 नोव्हेंबर (अबु धाबीचे शेख जायद इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम)

फायनल- 10 नोव्हेंबर (दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम)

You might also like