IPL मध्ये स्टोक्सच्या नावावर मोठा रेकॉर्ड, असा रेकॉर्ड बनवणारा तो पहिला खेळाडू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) दुसऱ्यांदा गोलंदाजीचा शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध स्टोक्सने अवघ्या 60 चेंडूत 107 धावांची नाबाद खेळी खेळत आठ गडी राखून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या दरम्यान त्याने 14 चौकार आणि तीन षटकार लगावले.

यापूर्वी 2017 मध्ये त्याने रायझिंग पुणे सुपरगिजंट्सकडून खेळताना 103 धावांची डाव खेळला होता. स्टोक्सचा आयपीएलमध्ये पदार्पण हंगाम होता आणि पुण्याने स्टोक्सला रिकॉर्ड 14.5 कोटीमध्ये खरेदी केले होते. त्या मोसमात त्याने 12 सामन्यांत 12 बळी घेतले आणि 312 धावाही केल्या होत्या.

त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्टोक्सला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. सामन्यानंतर स्टोक्स म्हणाला, ‘खरं सांगायचं तर संघासाठी असा डाव खेळण्यास वेळ लागला. मला हा फॉर्म दोन किंवा तीन सामन्यांपूर्वी हवा होता, जेव्हा आम्ही पात्र होण्यासाठी दुसर्‍याच्या निकालावर अवलंबून होतो.’

स्टोक्स म्हणाला, ‘आपल्या फॉर्ममध्ये परत येणे नेहमीच चांगले. आम्हाला आज या विजयाची आवश्यकता होती. हा चांगला विजय आहे. स्टोक्सच्या या सामन्यातल्या विजयी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ दहा गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला आहे. यासह रॉयल्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही जिवंत आहेत. संघाला आता उर्वरित दोन्ही सामने चांगल्या धावांच्या दराने जिंकण्याची गरज आहे.

राजस्थानला आपला पुढील सामना शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रविवारी कोलकाता नाईट रायडर्सशी खेळायचा आहे.