IPL 2020 मध्ये क्रिस गेलच्या वापसीमध्ये ‘अडसर’, न खेळता परत जावे लागू शकते

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – इंडियन प्रीमियम लीग 2020( IPL 2020 ) मध्ये पंजाब इलेव्हन (Kings XI Punjab) तीन सामने खेळली आहे. त्यापैकी जरी एकच सामना त्यांनी जिंकला असला तरी तिनही सामन्यांमध्ये चांगला खेळ पंजाब इलेव्हन ने दाखवला आहे. आयपीएल (IPL 2020) च्या सुरुवातीला वेस्टइंडिज (West Indies) चे ओपनर क्रिस गेल (Chris Gayle) यांच्या वापसीबद्दल खूप चर्चा होती.

पण आता मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ही चर्चा कुठेतरी थांबली आहे आणि पंजाब इलेव्हन च्या चाहत्यांची अपेक्षा सुद्धा मयंक अग्रवाल आपल्या शानदार फलंदाजीने पूर्ण करत आहे. मयंक अग्रवाल ने तीन सामन्या मध्ये एक शतक आणि एक अर्धशतक बनवत २०० पेक्षा जास्त धावा बनविल्या आहेत. पहिल्याच सामन्यात मयंक ने 89 धावा काढून आपली पारी प्रेक्षकांच्या मणी उतरवली.

काल राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals )च्या विरोधात 45 चेंडूत शतक ठोकले व तो भारतीय फलंदापैकी सर्वात कमी चेंडूत शतक मारणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. या अशा सादरीकरणामुळे गेल ची वापसी होणार की न खेळतात गेल ला परतावे लागणार याबाबत अजूनही साशंकता आहे. औरेंज कॅप यावेळी केएल राहुल यांच्याकडे आहे व मयंक अग्रवाल आणि केएल राहुल (K. L. Rahul ) यांच्यामध्ये केवळ एक धावाचा फरक आहे.