IPL 2020 : 437 दिवसांच्या पुनरागमनानंतर धोनीनं पूर्ण केलं ‘शतक’, केला ‘हा’ खास रेकॉर्ड

IPL 2020 MI vs CSK : आयपीएल 2020 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला पाच विकेटने पराभूत केले. या मॅचसोबत धोनीने 437 दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. इतक्या मोठ्या कालखंडानंतर मैदानमध्ये पाय ठेवताच धोनीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे, परंतु यावेळेस चर्चेचा विषय धोनीचा नवा लूक आहे. धानी नेहमी आपला लूक बदलत असतो, परंतु परंतु यावेळी त्याने वेगळ्यापद्धतीने दाढी आणि मिशी ठेवली आहे.

एमएस धोनीने आयपीएलमध्ये पूर्ण केले 100 कॅच
या मॅचमध्ये एमएस धोनीने विकेटच्या पाठीमागे दोन कॅच पकडले, यासोबतच आयपीएलमध्ये धोनीने 100 कॅच पूर्ण केले, ज्यामध्ये 95 त्याने विकेटकिपर म्हणून पकडले आहेत. याशिवाय तो टी-20 क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारा पहिला विकेटकिपर सुद्धा बनला आहे.

चेन्नईच्या विजयासोबतच धोनीने सीएसके कॅप्टन म्हणून आपला 100वा विजय मिळवला. यासोबतच धोनी आयपीएलमध्ये एक टिम कॅप्टन म्हणून 100 मॅच जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे.

पुन्हा एकदा जिंकली मने
आयपीएल 2020 च्या अगोदर मॅचमध्ये पुन्हा एकदा धोनीने सर्वांची मने जिंकली आहेत. जरी धोनी 39 वर्षांचा झाला असला आणि त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजसुद्धा तो फिटनेसच्या बाबतीत युवा क्रिकेटर्सला टक्कर देत आहे. या मॅचमध्ये धोनीने विविध विक्रम करत आणि काही शानदार कॅच पकडून आपल्या चाहत्यांची मने जिंकली.