IPL 2020 ची अंतिम तारीख ठरली ! यंदा डबल हेडर सामने नाहीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) हंगामातील खेळाडूंचा लिलाव महिन्याभरापूर्वीच झाला. कोलकाता येथे झालेल्या या लिलावात संघांनी आपापल्या खेळाडूंची निवड केली. आता आयपीएल हंगाम सुरू होण्यासाठी काही महिनेच बाकी आहेत. या लीगसाठी सर्वकाही सेट झालं असलं तरीही स्पर्धेची अंतिम तारीख मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामाची तारीख ठरली आहे. लवकरच याबाबत घोषरणाही केली जाईल. यंदाच्या लीगमध्ये काही बदल पहायला मिळणार आहेत असे संकेत सूत्रांनी दिले आहेत. या बदलांमध्ये सामन्याची वेळ आणि डबल हेड सामना असे मुद्दे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा आयपीएल हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार आहे. याशिवाय अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होणार आहे. इतकेच नाही तर ही लीग 45 ऐवजी 57 दिवसांसाठी खेळवण्यात येणार आहे अशी माहिती आहे.

सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, “अद्याप वेळापत्रक तयार झालेलं नाही. यंदाची लीग 29 मार्चला सुरु होणार असून अंतिम सामना 24 रोजी खेळवला जाणार आहे. ही लीग 45 दिवसांहून अधिक वेळ चालणार आहे. एका दिवसास एक सामना खेळवण्यास काहीच हरकत नसल्याचं” त्यांचं म्हणणं आहे. पुढे बोलताना सूत्रांनी सांगितलं की, “TRP महत्त्वाचा आहेच परंतु सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू असेल तोपर्यंत सामना संपवून प्रेक्षकांना घरी जाण्यास कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची आहे त्यामुळे सामना 7.30 वाजाता सुरू करण्याचा प्रयत्न आहे” असेही त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/