IPL-2020 : चेन्नई सुपरकिंगला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएलच्या कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने (101) चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. चेन्नईने विजयासाठी ठेवलेल 180 धावाच डोंगर दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. त्यावेळी नियमित गोलंदाज डॅरेन ब्राव्होच्या जागी रविंद्र जाडेजाला गोलंदाजी दिली गेली. अन् चेन्नई सुपरकिंग्जला हाच निर्णय महागात पडला. जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने 3 षटकार ठोकत दिल्ली संघाने विजश्री खेचून आली. या पराभवासोबतच चेन्नई सुपरकिंग्जला एक जबरदस्त मोठा धक्का बसला.ब्राव्हो दुखापतग्रस्त झाल्याने जाडेजाला षटक टाकावं लागलं, असे सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकाबाबत सांगितलं

प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने केलेल्या विधानामुळे चेन्नई सुपरकिंग्जला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. ब्राव्होच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे दुखापत बऱ्यापैकी गंभीर आहे. त्यामुळे पुढील काही सामन्यांना बाव्होला मुकावे लागू शकतं. त्याच्या दुखापतीचा अंदाज घेता त्याला तंदुरूस्त होण्यासाठी 15 दिवस लागू शकतात.

असा रंगला सामना
फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने 179 धावांचा पल्ला गाठला. सलामीवीर सॅम करन स्वस्तात बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी निभावली. वॉटसन 36 धावांवर बाद झाला पण डु प्लेसिसने 58 धावा केल्या. या दोघांनंतर अंबाती रायडू (45) आणि जाडेजा 33) यांनी संघाला 179 चा आकडा गाठून दिला.

180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे पटापट बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने 68 धावांची भागीदारी केली. पण श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टॉयनीस थोड्या धावा काढून बाद झाले. अलेक्स कॅरीही स्वस्तात बाद झाला. मग शिखरने आपलं पहिलं शतक झळकावत संघाला विजयासमीप नेलं. तर अक्षर पटेलने 5 चेंडूत 21 धावा करत संघाचा विजय साकारला.