IPL 2020 : KKR ला मोठा झटका ! संपुर्ण IPL मधून बाहेर झाला ‘हा’ सुपरस्टार खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या 13व्या सीजनमध्ये खेळाडूंना दिवसेंदिवस दुखापत होऊन बाहेर पडत आहेत. यातच आाता कोलकाता नाइट रायडर्सला मोठा झटका बसला आहे. कोलकात्याचा बॉलर आणि पहिल्यांदाच आयपीएलमध्ये प्रवेश मिळवलेला अमेरिकन क्रिकेटपटू अली खान आयपीएलच्या 13 सीजनमधून बाहेर पडला आहे.

क्रिकेटर अली खान याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. परंतू आतापर्यंत हे समजलेले नाही की, नेमके अली खान याला दुखापत कशी झाली ते. यापुर्वी कोलकाता नाइट रायडर्सचा बॉलर हॅरी गुर्नेला दुखापत झाल्याने अली खानला संघात घेतले होते.

आयपीएलकडून सांगितलं गेलं होतं की, अली खान हा आईपीएल फ्रेंचाइजीसोबत खेळणारा पहिला अमेरिकन क्रिकेटर आहे. दुर्दैवाने अली खानला दुखापत झाल्याने त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले आहे. अली खानला प्रॅक्टीसच्या दरम्यान दुखापत झाली होती, असंही सांगितलं जात आहे. यामुळे आता अली खान 2020च्या आयपीएलमध्ये खेळणार नाही.

अली खानच्या अगोदर दिल्ली कॅपीटलचा अमित मिश्रा आणि सनराईजर्स हैद्राबादच्या भुवनेश्वर कुमारलाही दुखापत झाल्याने ते आयपीएलमधून बाहेर झाले होते. 29 वर्षीय अली खानला आयपीएलमध्ये कोणत्याच सामन्यात खेळता आलं नाही. यापुर्वी अली खान कॅरेबियन प्रिमियर लिग जिंकणाऱ्या ट्रिनबागो नाइटराइडर्स टीमचा भाग होता. तिथं त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.