Video : … अन् ज्यावेळी IPL खेळाडूंना ‘मासिक पाळी’च्या प्रश्नांचा करावा लागतो ‘सामना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिकेटर्स म्हटले की सामान्यपणे क्रिकेटचीच चर्चा मात्र आता हेच क्रिकेटर्स मासिक पाळीबाबतही (menstrual period) बोलू लागले आहेत. भारतात आणि जगभरातील विविध समाजात मासिक पाळी संदर्भात उघडपणे आजही बोलले जात नाही. त्याच मासिक पाळीबाबत आयपीएलमधील (ipl) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) टीममधील खेळांडूूनी चर्चा केली आहे. मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी राजस्थान रॉयल्सने निने इंडिया (Niine India) या कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीशी करार करणारी आयपीएल मधील राजस्थान रॉयल्स ही पहिलीच टीम आहे. याचा मुख्य उद्देश्य या संघाने केलेल्या प्रत्येक धावामागे 9 मुलींना सॅनिटरी पॅड देणे आहे. या कंपनीमार्फत खेळाडूसोबत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणूून खेळांडूसाठी महिलांच्या मासिक पाळीसंबधित प्रश्नाच्या रॅपिड फायर क्विझचे आयोजन करण्यात आले होते.

राजस्थान रॉयल्सच्या खेळांडूना मासिक पाळीसंदर्भात वैयक्तीक अनुभव विचारण्यात आला. शिवाय त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी प्रामाणिकपणे उत्तरे दिले. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रॉबिन उथप्पा याने रॅपिड फायर क्विझचे संचालन केले होते. डेव्हिड मिलर, जोस बटलर, राहुल तेवतिया आदीनी या विषयावर आपली मते व्यक्त केली आणि विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली. या क्विझमध्ये उथप्पाने (pms) म्हणजे काय, त्याचा फुलफार्म विचारला. पण मिलरला ( Premenstrual syndrome) हे उत्तर देता आले नाही. त्यानंतर त्याने तुला मासिक पाळीसंदर्भात सर्वात पहिल्यांदा काय सांगण्यात आले आणि त्यावेळी तू किती वर्षाचा होतास असा प्रश्न विचारला. तसेच मासिक पाळी का येते आणि या पाळीसंदर्भात तू ऐकलेली सर्वात विचित्र गोष्ट कोणती आहे, असे देखील प्रश्न त्याला या क्विझमध्ये विचारण्यात आले.

अनेकदा निषिध्द समजल्या जाणा-या मासिक पाळीच्या चर्चेचा हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर अपलोड केला आहे. त्याला चला मासिक पाळी या विषयावर चर्चा करू असे कॅप्शन त्याला दिले आहे. दरम्यान काल झालेल्या सामन्यात कोलकोत्ता नाईट रॉयडर्सकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर राजस्थानच आयपीएलमधील आव्हान संपुुष्टात आले आहे. या सामन्यात राजस्थानने सुरुवातीलाच आपल्या 5 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात कमबॅंक करणे त्यांना शक्य झाले नाही.