IPL 2020 : रिकी पॉटिंगनं सांगितलं मुंबई इंडियन्सच्या सर्वात ‘स्फोटक’ खेळाडूचं नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला अबूधाबी येथे खेळला जाणार आहे. दिल्ली कपिटल्स स्पर्धेतील पहिला सामना २० सप्टेंबर रोजी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळणार आहे. दिल्ली कपिटल्स ११ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्सशी पहिला सामना खेळणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी दिल्ली कपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे खूप कौतुक केले आहे.

रिकी पॉंटिंगने कर्णधार रोहित शर्माचे डेंजर मॅन म्हणून वर्णन केले आहे. मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक फलंदाज कोण आहे, असे विचारले असता तो म्हणाला, “या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. तो जगात टी-२० मधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल त्याची कामगिरी विलक्षण असते.”

२०१३ मध्ये मुंबईचे कर्णधारपद हाती घेतल्यापासून संघाने आयपीएलचे चार विजेतेपद जिंकले आहेत. आयपीएलचा सर्वोत्कृष्ट संघ बनवण्यात रोहित शर्माची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पॉन्टिंग म्हणाला, “रोहित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात उत्तम टप्प्यातून जात आहे. त्याला मागे सोडणे सोपे नाही.” यापूर्वी रोहितनेही मुंबईचे प्रशिक्षक म्हणून रिकी पॉन्टिंगचे कौतुक केले होते. दुसरीकडे पाकिस्तानचा दिग्गज झहीर अब्बासनेही रोहितला क्लासिक खेळाडू म्हटले होते.

दिल्ली कपिटल्स टीम २०२०
श्रेयस अय्यर (कॅप्टन), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, डॅनियल सॅम्स, अ‍ॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्सर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नॉर्टजे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा.

मुंबई इंडियन्स टीम २०२०
रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डिकॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नाथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, क्रुणाल पांड्या, किरण पोलार्ड, राहुल चहर, ख्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसीन खान, मिशेल मॅक्लेनिगन, प्रिन्स बलवंत राय सिंह, अनुकूल रॉय, ईशान किशन.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like