IPL 2020 : तूर्तास रोहितच्या पुनरागमनाची घाई नको

दुबई : वृत्तसंस्था – सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या वैद्यकीय अहवालात तो पुन्हा दुखापतग्रस्त होण्याची शक्यता असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे रोहितच्या पुनरागमनाची घाई नको असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हंटले आहे.

युएईमध्ये इंडियन प्रीमिअर लीगवेळी रोहितला स्नायूच्या दुखापतीने सतावले होते. त्यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या संघात समावेश करण्यात आला नव्हता. दरम्यान, तो मुंबई इंडियन्ससाठी नेटमध्ये सराव करताना दिसला होता. त्यामुळे उलटसूट चर्चेला ऊत आला होता.

शास्त्री म्हणाले, रोहितला संघामध्ये न घेण्याचा निर्णय निवड समितीने त्याच वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर घेतला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे. आमचा त्यात समावेश नाही. वैद्यकीय समितीने एक अहवाल सोपवला होता आणि त्यांना आपली जबाबदारी चांगलीच माहित आहे. यात माझी कुठलीही भूमिका नाही. मी निवड प्रक्रियेचाही भाग नाही रोहितला पुन्हा दुखापत उद्भवू शकते असे वैद्यकीय अहवालात म्हंटले आहे. याची मला कल्पना आहे.