आश्चर्यकारक ! निकोलस पूरनच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा हा Video नक्की पाहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शारज्याच्या मैदानात राजस्थान रॉयल्सने षटकार आणि चौकांराची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाबने विजयासाठी २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ४ गडी राखत पूर्ण केलं. अष्टपैलू राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलने टाकलेल्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार मारत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. एक क्षणी पंजाब सामन्यात बाजी मारेल असं वाटतं असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला.

पण यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते पंजाबचा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या क्षेत्ररक्षणामुळे. आठव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनने दणदणीत शॉट मारला. हा षटकारच होता. मात्र, सीमारेषेवर क्षेत्रक्षण करणाऱ्या निकोलसने हवेत उडी मारत कॅच घेतला, त्याचवेळी पुरनचा तोल गेला, प्रसंगावधान दाखवत त्याने चेंडू सीमारेषेच्या आता फेकला. पूरनने केलेलं क्षेत्ररक्षण पाहून पंजाबचा फिल्डिंग कोच जॉंटी ऱ्हॉड्सने उभे राहत त्याचे कौतुक केलं. तसेच त्याच्या या क्षेत्र रक्षणामुळे समाज माध्यमात धुमाकूळ घातला आहे.

त्याचसोबत सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रितेश देशमुख यांनी सुद्धा पूरनचे कौतुक केले.

निकोलस पूरनने त्याआधी फलंदाजी करतेवेळी शेवटच्या षटकात ३ षटकार आणि १ चौकार मारत ८ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांची पिसं काढत पहिल्या विकेटसाठी तब्बल १८३ धावांची भागीदारी केली. त्यामध्ये मयंक अग्रवालने दुसरं सर्वात ४५ चेंडूत जलद शतक पूर्ण केलं. तर ५० चेंडूत मयंकने १०६ धावा करत बाद झाला. राहुलने ५४ चेंडूत ६९ धावा ठोकल्या.