IPLच्या 13 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, पहिलाच सामना ‘हायव्होल्टेज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढच्या महिन्याच्या २९ तारखेपासून आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होणार असून चाहत्यांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे. तसेच याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पहिला सामना हा हायव्होल्टेज म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

हा हंगाम २९ मार्च ते १७ मेपर्यंत चालणार असल्याची माहिती एका क्रिकेट वेबसाईटने दिली आहे. याअगोदरचा हंगाम ४४ दिवसांचा होता तर येणारा हंगाम ५० दिवसांचा असेल. या हंगामातील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार असून राजस्थान रॉयल्स सोडून सर्व टीमचे सामने त्यांच्या होमग्राउंडवर आणि राजस्थान रॉयल्सचे सामने गुवाहाटी येथे होणार आहेत.

यावर्षी सहा दिवसात केवळ एकाच दिवशी दोन सामने खेळले जाणार असून हे सामने फक्त रविवारी होणार आहेत, असे आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे म्हणणे आहे. तसेच या हंगामात एक आठवडा वाढवला असून त्यामुळेच आयपीएल ४४ ऐवजी ५० दिवस खेळली जाणार आहे. दुपारचे सामने ४ वाजता तर रात्रीचे सामने ८ वाजता सुरु होतील.

https://twitter.com/Kettavan_Memes2/status/1228691699003613184

या हंगामात बीसीसीआयने एएम लोढा यांच्या भारतीय संघाचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यामध्ये कमीतकमी दोन आठवड्यांचा फरक असावा, या शिफारसीकडे दुर्लक्ष केले आहे. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय सामना १८ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून त्याच्या ११ दिवसानंतर लगेच आयपीएल सुरु होणार आहे.

जाणून घ्या कोणत्या टीमचा सामना कधी ?