IPL 2020 : शिखर धवननं रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हे’ करणारा पहिलाच फलंदाज बनला

पोलिसनामा ऑनलाइन – KXIP vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीचा फलंदाज शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात लागोपाठ दोन शतक करणारा पहिला फलंदाज बनला आहे. धवनने दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसोबतच्या सामन्यात ही जबरदस्त कामगिरी केली आहे.

यासोबतच धवनने आयपीएलमध्ये 5000 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये 5000 किंवा त्यापेक्षा धावा बनवणारा पाचवा फलंदाज बनला आहे. आयपीएलच्या एका सीझनमध्ये अनेक फलंदाजांनी एकापेक्षा जास्त शतक केले आहे, परंतु कुणीही लागोपाठ दोन शतक केलेली नाहीत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने 2016 मध्ये चार शतक केली होती. अशाच प्रकारे क्रिस गेलने आरसीबीसाठी खेळताना 2016 मध्येच दोन शतक केली होती. हाशिम अमलाने 2017 मध्ये पंजाबसाठी दोन शतक केली होती आणि शेन वॉटसनने 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना दोन शतकं केली होती.

तर आयपीएलमध्ये 5000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत धवनशिवाय कोहलीने 5759, चेन्नई सुपर किंग्जच्या सुरेश रैनाने 5368 (रैना या सीझन खेळत नाही), मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 5158 आणि सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 5037 धावा केल्या आहेत.

धवनने आयपीएलच्या एका सीझनमध्ये लागोपाठ चौथे अर्धशतक केले आणि विशेष यादीत पोहचला. आयपीएलमध्ये एक सीझनमध्ये लागोपाठ सर्वात जास्त पाच अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सहवागने 2012 सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स (त्यावेळी दिल्ली डेयरडेव्हिल्स) साठी खेळताना हा रेकॉर्ड केला होता.

सहवागशिवाय राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर आणि सनरायजर्सच्या डेव्हिड वॉर्नरने सुद्धा एका सीझनमध्ये लागोपाठ पाच अर्धशतक केली होती. बटलरने ही कामगिरी 2018 मध्ये केली होती. अशाच प्रकारे वार्नरने 2019 सीझनमध्ये लागोपाठ पाच अर्धशतक केली होती. एक सीझनमध्ये लागोपाठ चार अर्धशतक करणार्‍यांमध्ये धवनशिवाय विराट कोहली आणि हैद्राबादचा केन विलियम्सन सुद्धा सहभागी आहे. कोहलीने 2016 मध्ये ही कामगिरी केली होती, तर विलियम्सने 2018 मध्ये ही कामगिरी केली होती.