IPL मध्ये स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया म्हणाला – ‘मला माफ करा मित्रांनो’

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना राहुल तेवतियाने जबरदस्ती खेळी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आयपीएल 2020 आयपीएलच्या इतिहासातील या धमाकेदार सामन्याचा राहुल तेवतिया हिरो ठरला आहे. मात्र, गंमत म्हणून राहुलने (Rahul Tewatia) सोशल मीडियावर माफी मागितली आहे.

पंजाबने केलेल्या 223 धावांचे लक्ष्य गाठताना राहुलने शेल्डन कॉर्टेलच्या एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारून चित्रच बदलले होते. तेवतियाने 12 चेंडूत 6,0,2,1,6,6,6,6,0,6,6, अशी जबरदस्त खेळी केली. त्याने पहिल्या 19 चेंडूत फक्त 8 धावा केल्या होत्या. पण त्यानंतरच्या 12 चेंडूत 45 धावा केल्या. या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने मोठी धावसंख्या गाठू शकली.

या खेळी संदर्भातच राहुल तेवतियाने सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्याच्या स्फोटक खेळीनंतर सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या अचानक वाढली आहे. त्याने केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या ट्विमध्ये राहुलने गंमतीने लिहले आहे की, माफ करा, मला फार उशिर झाला. यावर ट्विटवर युजर्सने सुद्धा गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने म्हटले, तु सामन्यात उशिरा खेळण्यास आला. पण अगदी योग्य पद्धतीने खेळलास.

राहुलच्या या जबरदस्त खेळानंतर राजस्थान रॉयल्स संघाने ट्विटवरील बायो बदलून लिहिले आहे की, 2020 हे वर्ष राहुल तेवतियाच्या नावाने ओळखले जाईल.

तर विरेंद्र सेहवागने राहुलचे कौतूक करण्यासाठी केलेल्या ट्विट लिहिले आहे की, तेवतियाच्या अंगात माता आली आहे. क्रिकेटमध्ये काय कमबॅक केले आहे. क्रिकेट सुद्धा आयुष्यासारखे असून एका क्षणात बदलते.