IPL चा नवा स्पॉन्सर Dream 11 : जाणून घ्या ‘या’ कंपनीबाबत, काय आहे चीन ‘कनेक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आयपीएल 2020 च्या स्पॉन्सरची घोषणा झाली आहे आणि यावेळी ड्रीम 11 ने वीवो ला रिप्लेस केले आहे. मात्र, वीवोसोबत आयपीएलसाठी बीसीसीआयचे कॉन्ट्रॅक्ट यापुढे सुद्धा होते, परंतु वीवो आणि बीसीसीआयने घोषणा केली आहे की, एक वर्षासाठी हे थांबवण्यात येत आहे.

ड्रीम 11 बाबत अनेक प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. काही लोक ट्विट करत आहेत की, या कंपनीत चीनने पैसा लावला आहे. पण ही भारताचीच कंपनी असून तिचे संस्थापक भारतातीलच आहे. या कंपनीत चीनी कंपनीने पैसे गुंतवलेले आहेत.

या कंपनीचे अनेक इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांच्यापैकी एक चीनची टेन्सेंट कंपनी सुद्धा आहे. ड्रीम 11 मध्ये 10% स्टेक टेन्सेंटकडे आहेत.

ड्रीम 11 कंपनी गेमिंग अ‍ॅपद्वारे कशी पॉप्युलर झाली आणि आता आयपीएलची स्पॉन्सर कशी बनत आहे, याबाबत जाणून घेवूयात. ड्रीम 11 ची पॅरेंट कंपनी स्पोर्टा टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड आहे, जी मुंबईत रजिस्टर्ड आहे.

क्रिकेटशिवाय अनेक स्पोर्ट आहेत…

ड्रीम 11 केवळ क्रिकेटशीच संबंधीत नाही तर ती फँटेसी स्पोर्ट गेमिंग अ‍ॅप हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल आणि कबड्डीमध्ये सुद्धा आहे. हे सर्व फँटेसी स्पोर्ट गेम या अ‍ॅपवर खेळले जाऊ शकतात.

ड्रीम 11 मुंबई बेस्ड स्पोर्ट अ‍ॅप आहे, जे अँड्रॉईड आणि आयओएससाठी उपलब्ध आहे. अ‍ॅप 106एमबीचे आहे आणि त्याचे डाऊनलोड करोडोमध्ये आहेत. ड्रीम 11 मध्ये चीनी कंपनी टेन्सेंटचीसुद्धा गुंतवणूक आहे.

2008 मध्ये हर्ष जैन आणि भावित सेठने ड्रीम 11 ची सुरूवात केली. हे दोघेही बालपणाचे मित्र आहेत आणि त्यांना स्पोर्टची आवड आहे. आयपीएल 2008 सोबतच ड्रीम 11 बाबत त्यांनी विचार केला, कारण भारतात तेव्हा अशाप्रकारचे फँटेसी लीगसाठी कोणतेही पॉप्युलर अ‍ॅप नव्हते.

2012 पासून सुरू झाली पॉप्युरॅलिटी…

2012 पासून ड्रीम 11 फँटेसी लीग भारतात पॉप्युलर होण्यास सुरूवात झाली आणि कंपनीने याचे जोरदार मार्केटींग केले. यानंतर ती क्रिकेट फॅन्समध्ये वेगाने पॉप्युलर झाली आणि अ‍ॅप मोठ्याप्रमाणात डाऊनलोड केले गेले.

2014 पर्यंत कंपनीजवळ 10 लाख रजिस्टर्ड यूजर्स झाले, तर 2016 मध्ये आकडा वाढून डबल झाला. यानंतर सतत या अ‍ॅपचे यूजर्स वाढले आणि दोन वर्षानंतर म्हणजे 2018 मध्ये 11 चे 40 लाख यूजर्स झाले.

धोनीला बनवले ब्रँड अम्बॅसेडर…

2018 मध्ये ड्रीम 11 ने आयसीसीसोबत ऑफिशियल आयसीसीच्या फँटेसी लीगमध्ये सुद्धा पार्टनर बनली. याशिवाय प्रो कबड्डी लीग आणि इंटरनॅशनल हॉकी फेडेरेशनसोबत सुद्धा कंपनीने स्ट्रॅटिजीक पार्टनरशिप केली आहे.

2018 मध्येच ड्रीम 11 ने महेंद्र सिंह धोनीला आपला ब्रँड अम्बॅसेडर बनवले आणि विचारपूर्वक धोनी कॅम्पेनची सुरूवात केली. धोनी ब्रँड अम्बॅसेडर बनताच अ‍ॅप ला आणखी डाऊनलोड मिळू लागले.

2019 च्या आयपीएलमध्ये ड्रीम 11 ने सात क्रिकेटर्ससोबत पार्टनरशिप केली. इतकेच नव्हे, या कंपनीने मागील वर्षी आयपीएलमध्ये सुद्धा सात फ्रेंचायजीसोबत मल्टी चॅनल मार्केटिंग कॅम्पेन केले आहे.

कसे असते गेमिंग…

आम्ही ड्रीम 11 खेळणार्‍या काही युजर्सशी बातचीत केली आणि त्यांनी या अ‍ॅपबाबत सांगितले. ड्रीम 11 अ‍ॅपमध्ये जगभरातील क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल आणि कबड्डी सारखे गेम फीचर आहेत. या अ‍ॅपमध्ये स्कोअर लाईव्ह सुरू असतो, परंतु यासाठी 50 रुपये खर्च करावे लागतात.

कोणत्याही मॅचवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे प्राईज पूल दिसेल. कॉन्टेस्टमध्ये एंटर होण्यासाठी एंट्री फीस द्यावी लागते. यानंतर तुम्ही स्वता टीम क्रिएट करू शकता.

टीम सेलेक्ट केल्यानंतर खर्‍या मॅचमधील परफॉर्मन्सनुसार यूजर्सला पॉईंट मिळतात. कॉन्टेस्टमध्ये टॉपवर राहिल्यास लाखो रूपयांचे बक्षीस जिंकता येते. यामध्ये 50 लाखांपर्यंत किंवा कोराडोचे पूल प्राईज असते.

याच्या रँकच्या हिशेबाने पैसे मिळतात. सिंपल फॉर्मूला आहे, जेवढे चांगले पॉईंट होतील, जिंकण्याची संधी तितकी जास्त असते. तुमचा प्लेयर कसा परफॉर्म करत आहे, हे जिंकण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.