CSK सोबतचा रैनाचा प्रवास संपला ? हॉटेलच्या रूम वरून झाली वादाला सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरेश रैना बद्दल सांगितलं जात आहे की, ‘वैयक्तिक कारणांमुळे’ तो इंडियन प्रीमियर लीग मधून बाहेर पडला, पण असं वाटत आहे की, चेन्नई सुपर किंग्स सोबतचा त्याचा प्रवास संपला की काय. कारण ही फ्रेंचाइजी 2021 च्या सत्राआधीच त्याच्याशी असणारे संबंध तोडू शकते.

चेन्नईची टीम सध्या दुबईमध्ये आहे. या टीम मध्ये 13 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. आयपीएल सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला सुरेश रैनाने सीएसके टीम सोडून येण्याचं कोरोना हे देखील कारण सांगितलं जातं आहे.

पण आता अशी माहिती मिळाली की, काही कारणांनी सीएसकेचे मालक बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन नाराज होते. सूत्रांनी पीटीआयला सांगितलं, ‘सीएसकेच्या नियमानुसार कोच, कॅप्टन आणि मॅनेजर यांना हॉटेल मध्ये राहण्यासाठी सूईट्स दिले जातात, पण टीम ज्या हॉटेलमध्ये थांबते तिथं रैनाला देखील सूइट मिळतो. अडचण इतकीच होती की त्याच्या रूम मध्ये बाल्कनी नव्हती.’

सूत्रांनी सांगितलं, ‘हे कारण होतं, पण मला नाही वाटत की रैना भारतात परत येण्यासाठी हे कारण पुरेसं आहे. टीम मध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यापेक्षाही वेगळं काहीतरी कारण असू शकतं.’ ही परिस्थिती पाहता रैना एप्रिल 2021 पासून सुरु होणाऱ्या आयपीएल मध्ये चेन्नई टीम मधून बाहेर जाऊ शकतो. रैना पुन्हा टीम मध्ये येऊ शकतो का असा प्रश्न विचारला असता सूत्रांनी सांगितलं, ‘तो या सत्रात टीममध्ये परत येऊ शकणार नाही. कदाचित यामध्ये दुसरं काहीतरी कारण असू शकतं.’

ते म्हणाले, ‘जो खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे तो पुन्हा कोणत्याही क्रिकेटमध्ये खेळणार नाही असं होत नाही, रैना पुन्हा सीएसके मध्ये परत येऊ शकतो.’ सीएसकेने ऋतुराज वर जास्त बोली लावली होती. अशी आशा आहे की तो लवकर कोरोनावर मात करून पुन्हा टीम मध्ये येईल. सूत्रांनी सांगितलं की, ‘सीएसकेने रैनाच्या जागी दुसरा खेळाडू घेण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही.’

रैनाने आता माफी मागितली तरी काही प्रभाव पडणार नाही, कारण टीम भविष्याचा विचार करत आहे. सूत्रांनी सांगितले की, ‘मला माफीबद्दल काही माहीत नाही पण सीएसके आता ऋतुराजला भविष्यासाठी तयार करेल आणि त्यानुसार धोनी त्याची रणनीती तयार करेल.’ रैनाने सीएसके कडून 164 मॅचमध्ये सर्वाधिक 4527 धावा काढल्या आहेत. आयपीएल मध्ये त्याच्या नावावर 5368 धावांची नोंद आहे. रैना टूर्नामेंट मध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराट कोहली (5412) नंतर दुसऱ्या स्थानी आहे.