IPL 2020 : विजय मिळवून देऊ न शकल्याने भावूक झाला ईशान किसन, वायरल होत आहे ‘हा’ फोटो

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2020 ) सीझन 13 च्या 10 व्या मॅचमध्ये थरार आणि उत्कटतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टिमध्ये खेळण्यात आलेल्या ही मॅच शेवटच्या चेंडूवर ट्विस्ट झाली. परंतु, सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर बाजी मारण्यात यशस्वी झाली. पराभवाशिवाय या मॅचमध्ये 99 धावा करणारा ईशान किसन सर्वात मोठा हिरो म्हणून समोर आला. मात्र, ईशान किसन पराभवानंतर खुप नाराज झाला आणि त्याचा हाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

202 चे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेली मुंबई इंडियन्सची टीम डावाच्या 14 व्या ओव्हरपर्यंत सामन्याच्या एकदम बाहेर दिसत होती. मुंबई इंडियन्सला शेवटच्या 6 ओव्हरमध्ये जिंकण्यसाठी 104 धावांची गरज होती. असे वाटू लागले होते की, एखादा चमत्कारच मुंबईला विजय देऊ शकतो.

ईशान किसन आणि किरण पोलार्डने काहीतरी वेगळेच ठरवले होते. या दोन खेळाडूंनी मॅच मुंबईच्या बाजूने आणण्यासाठी पूर्ण जोर लावला. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूवर केवळ दोन आणखी धावा घेऊन मुंबई ही मॅच जिंकू शकत नव्हती.

परंतु, ईशान किसनने दोन चेंडूत दोन षटकार ठोकून मॅचचे पारडे मुंबईकडे झुकवले. 5 व्या चेंडूवर ईशान किसन 99 धावा करून आऊट झाला. शेवटच्या चेंडूवर मुंबईला जिंकण्यासाठी 5 धावा पाहिजे होत्या. पोलार्ड केवळ चौकार ठोकू शकला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. सुपर ओव्हरमध्ये आरसबीने सहजपणे मुंबई इंडियन्सला पराभूत केले.

शेवटच्या आव्हरमध्ये आऊट झाल्यावर ईशान किसन खुपच भावूक झाला. किसन टीमला विजय मिळवून देऊ न शकल्याने इतरांपासून बाजूला जाऊन बसला. ईशांत किसनचा हा फोटो सोशल मीडियावर खुप वायरल होत आहे.