IPL 2020 : 10 कोटींना विकला गेला होता ‘हा’ ‘स्फोटक’ ऑलराऊंडर, पुढच्या सामन्यातही नाही देणार विराटला ‘साथ’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आर्म स्ट्रेचने झगडत असलेले दक्षिण आफ्रिकेचे अष्टपैलू ख्रिस मॉरिसचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध गुरुवारी खेळणे निश्चित नाही. टीमचे क्रिकेट ऑपरेशनचे संचालक माईक हेसन यांनी ही माहिती दिली. आरसीबीने मॉरिसला दहा कोटींमध्ये विकत घेतले आहे. विराट सेनेने जिंकलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा पहिला सामना देखील ते खेळू शकले नाहीत.

आरसीबीच्या ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हेसन म्हणाले की, ‘काही दिवसांपासून ख्रिस मॉरिस आर्म स्ट्रेचच्या समस्येशी झगडत आहे. त्यांच्या गोलंदाजीची भूमिका मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये महत्वाची असून ते फलंदाजीमध्येही उपयुक्त आहेत. ते म्हणाले, यामुळे टीममधील संतुलन बिगडले आहे कारण ते थ्री इन वन क्रिकेटर आहेत, त्यांची जागा घेणे सोपे नाही. एक किंवा दोन सामन्यात ते संघात असतील अशी आशा आहे.