Video : लाखो मराठी तरूण, तरुणींना जो प्रश्न विचारतात तोच प्रश्न विराट अनुष्काला विचारतो तेव्हा…

पोलीसनामा ऑनलाईन – जेवलीस का ? हा असा एक प्रश्न आहे जे लाखो मराठी तरूण तरुणींना विचारतात. त्यांचा सवादच या प्रश्नानं सुरू होतो. परंतु आता चक्क रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार (Royal Challengers Bangalore) विराट कोहली (Virat Kohli) याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात तो पत्नी अनुष्काला थेट मैदानातून हा प्रश्न विचारत आहे.

विराट आणि अनुष्काचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यात विराट मैदानात आणि अनुष्का स्टेडियममध्ये दिसत आहे. मैदानात आपल्या संघासोबत असलेला विराट अनुष्काला दुरूनच विचारत आहे जेवलीस का ? यावर अनुष्काही हसत हसत दोन्ही थम्स अप दाखवत हो असं उत्तर देत आहे. दोघांचाही हा संवाद खाणाखुणातून सुरू आहे.

View this post on Instagram

Couple Goals 💕 Follow ❤️ 🔥@music__and__masthi 🔥 ❤️ #Followusformore . . . 📽️ For more videos of 💕 📽️ #TollyWood #BollyWood #VideoSongs #Musically #Dance #DanceVideos 📽️🎥❤️ @instatrendsoffl #combination #love #viral#tiktok#telugulovesongs#telugulovefailurewhatsappstatus#telugulovers #telugulovesongs #telugudubssmash #viratkohli #virushka #anushkasharma DISCLAIMER ‌This photo, video or Audio is not owned by ourselves ‌The copyright credit goes to respective owners ‌This video is not used for illegal sharing or profit Making ‌This video is purely Fan made ‌If any problem Message us on Instagram and the video will be removed ‌No need to report or send strike ‌Credit/Removal:[email protected]__and__masthi

A post shared by MUSIC & MASTHI (@music__and__masthi) on

विराट आणि अनुष्का यांचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. युएईमधील हा व्हिडीओ आहे. चेन्नईविरुद्ध बँगलोर सामन्यात विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिनं लाल रंगाचा ड्रेस घातल्याचं दिसत आहे. ती याआधीही बँगलोरच्या सामन्यांना उपस्थित होती.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिची बुलबुल सीरिजही रिलीज झाली आहे. अ‍ॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.

You might also like