IPL 2020 : Live मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने विराट कोहलीच्या डोळ्यात डोळे घालून दिली ‘ठस्सन’, Video वायरल

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय टीमची घोषणा झाल्यानंतर सूर्यकुमार यादवचे नाव चर्चेत आहे. तो टी20 सीरीजसाठी टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी दावेदार होता. परंतु, त्याची निवड करण्यात आली नाही. 28 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या सामन्यात सूर्यकुमारने अर्धशतक लगावले आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला. त्याने 43 चेंडूत 10 चौकार आणि एक षटकारच्या मदतीने नाबाद 79 धावांची खेळी केली आणि मुंबईला आठवा विजय मिळवून दिला.

जेव्हा आमने-सामने आले कोहली-सूर्यकुमार
या मॅचदरम्यान एक क्षण असा सुद्धा आला जेव्हा सूर्यकुमार आणि विराट कोहली आमने-सामने आले. ही घटना मुंबईच्या डावाच्या 13व्या ओव्हरमध्ये घडली. डेल स्टेनच्या या ओव्हरचा शेवटच्या चेंडूला त्याने डिफेंड केले. चेंडू कोहलीकडे गेला. यावर सूर्यकुमार यादव त्याच्याकडे पापण्या न हलवता पहात होता. कोहलीसुद्धा त्याच्याकडे एकटक पहात होता. तो चेंडूला घामाने चमकवत त्याच्याजवळ आला आणि उभा राहिला. नंतर सूर्यकुमार तेथून बॅट उचलून निघून गेला. तरीसुद्धा कोहली त्याच्याकडे पहातच राहीला.

सूर्यकुमारच्या चेहर्‍यावरील भाव स्पष्ट सांगत होते की, तो रागात आहे आणि टीममध्ये निवड न झाल्याने त्याला त्रासदेखील होत आहे. मुंबईला मॅज जिंकून दिल्यानंतर त्याने डगआऊटकडे हाताने इशारा केला. जसे की, अजून मी आहे, अजून मी आहे, आराम करा.

दिग्गदजांकडून मिळाली शब्बासकी
सूर्यकुमारच्या शानदार फलंदाजीबाबत अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कोच रवि शास्त्रीचा सुद्धा समावेश आहे. शास्त्रीने सूर्यकुमारचा फोटो पोस्ट करत लिहिले की, चांगला खेळ. धैर्य राख. तर वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपने मॅचमध्ये कॉमेंट्री दरम्यान म्हटले की, सूर्यकुमार यादव मागील तीन-चार सीझनपासून टीम इंडियावर हक्क सांगत आहे. परंतु, त्यास संधी मिळत नाही. परंतु, तो अशाच प्रकारे खेळत राहील तर त्याचा टाइम येणार आहे.

माजी क्रिकेटर कृष्णामाचारी श्रीकांतने म्हटले, माहीत नाही सूर्यकुमारला टीम इंडियामध्ये येण्यासाठी आणखी काय-काय करावे लागेल. आशा आहे की, तो लवकरच भारतीय टीममध्ये खेळताना दिसेल.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि सनरायजर्स हैद्राबादचा माजी कोच टॉम मूडीने म्हटले की, सूर्यकुमार यादवला खेळताना पहाताना मजा येते. हा समजणे अवघड आहे की, त्यास वनडे किंवा टी20 टीममध्ये का घेतले गेले नाही.

मुंबई इंडियन्सचा माजी क्रिकेटर मिचेल मॅक्लनघनने सुद्धा सूर्यकुमारचे कौतूक केले आणि आपल्या विनोदी शैलीत बीसीसीआयवर निशाणा साधला. त्याने म्हटले भारताचा मिस्टर 360 डिग्री सूर्यकुमारने शानदार खेळी केली. भाऊ! तुझी क्वालिटी दिखवत रहा. तसा तू निळ्या जर्सीत चांगला दिसतो.

या सीझनमध्ये 40 ची सरासरी आणि 155 चा स्ट्राइक रेट
सूर्यकुमार यादवने आयपीएल 2020 मध्ये 12 मॅचमध्ये 40.22 च्या सरासरीने 362 रन बनवल्या आहेत. त्याने या सीझनमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत. मुंबईकडून यावेळी धावा बनवण्यात दुसर्‍या नंबरवर तो आहे. त्याचा स्ट्राइक रेट सुद्धा 55 च्या वर आहे.

You might also like