IPL-2021 : CSK च्या संघात कोरोनाची ‘एन्ट्री’; 3 खेळाडूंना Corona ची लागण, तर कोटलावरील 5 ग्राऊंड्समन्सनची टेस्ट पॉझिटिव्ह

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोनाने अख्या जगात थैमान घातले असून आता मात्र त्या कोरोना विषाणूने क्रिकेट मध्ये सुद्धा आगमन केलं आहे. तर आयपीएलच्या सुरक्षित जागेत सुद्धा त्याचा शिरकाव झाला आहे. आयपीएलमधील सध्या फार्मात असणारी टीम म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या संघात कोरोनाने शिरकाव केला असून, यामधील ३ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समजते. तर दिल्लीतील कोटला ग्राऊंडवरील ५ जणांना सुद्धा कोरोना झाला आहे. तसेच, कोलकाता नाईट रायडर्सचे ( KKR) वरूण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर्स यांना देखील कोरोना झाला आहे. असे वृत्त सकाळी समजलं आहे. यावरून आजचा केकेआर VS रॉयल चॅलेंजर बंगलोर सामना स्थगीत केला गेला.

गेल्या वर्षी सुद्धा कोरोनाने धुमाकूळ घातलं होतं. त्यामुळे गेल्या वर्षी यूएईत झालेली आयपीएल स्पर्धा त्यावेळी चेन्नई सुपर किंगचे प्लेअर ऋतुराज गायकवाड आणि दीपक चहर यांच्यासह १३ खेळाडूंना कोरोना झाला होता. त्या धास्तीमधून चेन्नई टीमच्या कामगिरीवर परिणाम दिसून आला होता. यंदाही कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. चेन्नई सुपर किंगचे सीईओ कशी विश्वनाथ, गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांना कोरोनाची लागण झाली आहे. बाकींचा अहवाल नकारात्मक आला आहे. तर दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कोटला मैदानावर IPL चे सामने होत आहेत आणि त्या स्टेडियमवर काम करणाऱ्या ५ ग्राऊंड्समनना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते.

गेल्या वर्षी कोरोनाचा फटका चेन्नई खेळाडूंच्या कामगिरीवर पडला. त्यामुळे तो परिणाम सोडून देऊन यंदा एक आत्मविश्वासाने मैदानावर खेळण्यास सामोरे जात आहे. ऋतुराज गायकवाड, फॅफ ड्यू प्लेलिस या २ सलामीवीरांची कामगिरी संघाच्या विजयात महत्त्वाची ठरत आहे. रॉयल चॅलेंजर बंगलोरचा माजी खेळाडू मोईन अली चेन्नई सुपर किंग्ससारखं मोठं वरदानच घेऊन आला आहे. सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि अंबाती रायुडू हे अनुभवी त्रिकुट संघाला वाचवण्यासाठी खंबीर आहेत. महेंद्रसिगं धोनीची बॅट अद्याप तळपली नसली तरी त्याचे चाणाक्ष नेतृत्व संघासाठी नेहमीप्रमाणे फलदायीच ठरतेय. सॅम कुरन हा चेन्नई सुपर किंग्सला एक तडपदार उत्कृष्ट हिरा म्हणावा लागेल. फलंदाजीतही त्याचे योगदान संघाला मिळत आहे. दीपक चहर, शार्दूल ठाकूर, लुंगी एनगिडी यांनी सातत्य राखल्यास संघ अजून मजबूत होईल. तर ड्वेन ब्राव्हो हा दुसऱ्या टप्यात महत्वपूर्ण प्लेअर ठरणार आहे.