IPL 2021 | UAE मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार पहिला सामना, ‘या’ दिवशीपासून सुरू होणार आयपीएलची दुसरी फेज; जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने यूएईमध्ये आयोजित वीवो आयपीएल (VIVO IPL 2021) च्या उर्वरित मॅचेसच्या कार्यक्रमांची घोषणा केली आहे. यूएईमध्ये 27 दिवसांच्या कालावधीत एकुण 31 मॅच खेळावल्या जातील. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे आयपीएलचा 14वा सीझन मध्येच थांबवावा लागला होता. बीसीसीआयने नंतर सांगितले होते की, उर्वरित IPL-2021 च्या मॅचेस यूएईमध्ये खेळवल्या जातील.

पहिली मॅच 19 सप्टेंबरला
बीसीसीआयच्या नवीन शेड्यूलनुसार, 19 सप्टेंबरला दुबईत चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (Chennai Super Kings and Mumbai Indians) मधील मॅचने आयपीएलच्या उर्वरित सीझनची सुरूवात होईल. यानंतर मॅच अबू धाबीत शिफ्ट केल्या जातील, जिथे कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) चा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore) सोबत होईल. शारजाह (Sharjah) 24 सप्टेंबरला आपल्या पहिल्या खेळाची यजमानी करेल. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत होईल.

दुपारी साडेतीन आणि सायं. साडेसातची वेळ
UAE मध्ये 13 मॅच दुबईत खेळवल्या जातील, 10 मॅच शारजाहमध्ये होतील, तर 8 मॅच अबूधाबीत (Abu Dhabi) आयोजित केल्या जाती. 7 मॅच डबल हेडर होतील, ज्यामध्ये पहिल्या मॅचची सुरूवात भारतीय वेळेनुसार साडेतीन वाजता होईल. तर, सायंकाळी आयोजित होणार्‍या सर्व मॅचची सुरुवात सायंकाळी साडेसात वाजता होईल.

अंतिम सामना दुबईत 15 ऑक्टोबरला
तर, लीगची शेवटची मॅच 8 ऑक्टोबरला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळली जाईल.
पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला दुबईत होईल,
तर एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2, 11 आणि 13 ऑक्टोबरला शारजाहमध्ये खेळवली जाईल.
आयपीएलच्या या सीझनचा अंतिम सामना (IPL final) दुबईत (Dubai) 15 ऑक्टोबरला होईल.

Web Title :-  IPL 2021 | bcci announces schedule of vivo ipl 2021 in uae

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Police Recruitment 2021 | मुंबई पोलीस दलात विधि अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

Yavatmal Crime | भरदिवसा गोळीबाराचा थरार ! पुसदमध्ये डोक्यात गोळी लागून मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाचा मृत्यू