दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवरील कर्मचार्‍यांनी बुकीला दिलं मॅचचं ‘बॉल टू बॉल’ अपडेट, IPL बेटिंगच्या मोठया घबाडाचा पर्दाफाश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षीचा इंडियन प्रीमियर लीग (IPL-२०२१) स्थगित करण्यात आला. यानंतर आता सामना दरम्यान केलेल्या सट्टेबाजीची प्रकरणे समोर येत आहेत. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावरील एका सफाई कामगाराला सट्टेबाजीवरून अटक केली आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

IPLचा सामना सुरू असताना स्टेडियमवरील सफाई कर्मचारी कॉलवरून संबंधित IPL बुकीला सामन्याचे ‘बॉल टू बॉल’ लाइव्ह अद्यायावत माहिती द्यायचा. ग्राउंडवर सुरु असणारा IPL सामना आणि टीव्हीवर होणारं थेट प्रसारण यामध्ये काही सेकंदांचा फरक असतो. यामुळेच याचा फायदा घेऊन IPL ची सट्टेबाजी केली जात आहे हे समोर आलं आहे. यावरून BCCI च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका अधिकाऱ्याने त्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आहे. मात्र त्या सफाई कर्मचाऱ्याने तेथून पलायन केले. त्याने २ मोबाइल तिथंच टाकून पलायन झाला आहे. फोन दिल्ली पोलिसांकडे देण्यात आल्याचे ACB चे अधिकारी शब्बीर हुसेन यांनी म्हटले आहे.

याचप्रमाणे दुसरे एक प्रकरण पोलिसांनी उघड करून दिल्ली पोलिसांकडून अटक केल्याची माहिती शब्बीर हुसेन यांनी दिलीय. २ मे ला पोलिसांनी राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या सामन्याचे खोटे मान्यता पास देखील जप्त करण्यात आले आहेत. तसेच २ वेगवेगळ्या दिवशी खोट्या पासच्या जोरावर दिल्लीच्या ग्राउंडवर प्रवेश मिळवला. तर ज्यावेळी रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला पळून जाण्यात यश आलं आहे. तसेच, याबाबत त्या त्यांची सर्व माहिती आमच्याकडे आहे. त्याचं आधारकार्ड, फोटो आणि अन्य कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलीय, म्हणून दिल्ली पोलिसांकडून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शब्बीर हुसेन शेखदम खंडवावाला यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान, अरुण जेटली स्टेडियममधील सफाई कर्मचारी सामना दिसेल अशा एका जागेवर उभा होता. त्यादरम्यान BCCI च्या ACB पथकातील एका सदस्याने बघितलं, तो फोनवर बोलत होता. त्या अधिकाऱ्यानं याबाबत विचारपूस केली असता त्या सफाई कर्मचाऱ्याने मी माझ्या प्रेयसीसोबत कॉलवर बोलत असल्याचे म्हटले. तात्काळ त्या अधिकाऱ्याने त्याचा मोबाइल घेऊन अलीकडील संपर्क यादी तपासली असता, त्यावेळी तो कर्मचारी तेथून पलायन झाला. मुख्यतः म्हणजे त्याच्या गळ्यात स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यासाठीचा मान्यता पास सुद्धा होता. म्हणजेच क्लास – ४ मधील पास त्या सफाई कर्मचाऱ्याच्या गळ्यामध्ये होता, तर असला पास बस ड्रायव्हर, क्लिनर आणि अन्य कर्मचारी वर्गाला देण्यात येतोय. अशी माहिती त्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलीय.